Baby Elephant Viral Video : प्राणी असो किंवा मानव सगळेच आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यामुळे अशी अनेक माणसं असतात; जे वेळप्रसंगी मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्यांना मदत करायला धावतात. कारण – ही माणसे असे विचार करतात की, आपले आपुलकीचे दोन शब्द किंवा एखादी कृती एखाद्या व्यक्तीला निराशेतून किंवा संकटातून बाहेर काढू शकते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये हत्तीच्या पिल्लाला जीवनदान मिळाले आहे.

व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडमधील रायगड येथील आहे. ३ जून रोजी छत्तीसगडमधील रायगड जिल्यातील चिल्कागुडा गावात एका खड्यात पडला. हत्तीचे पिल्लू पडले होते.एनडीटीव्हीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, हत्तीचे पिल्लू लैलुंगा आणि घरघोडा वनक्षेत्रात फिरणाऱ्या एका मोठ्या कळपाचा भाग होते आणि जेव्हा कळप त्या भागात पाणी पित पिऊन आंघोळ करत होता तेव्हा ते पिल्लू खड्यात अडकले.गावकरी आणि वन अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या मदतीने हत्तीच्या बाळाला वाचवले.

५० तासांनंतर हत्तीच्या पिल्लाला काढलं बाहेर (Viral Video)

मग हत्तीचे पिल्लू खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांची धडपड सुरु झाली. तसेच वेळ न घालवता, ग्रामस्थांनी तातडीने त्या भागात धाव घेतली आणि पिल्लाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हत्तीच्या पिल्लाला हालचाल करता यावी यासाठी मार्ग तयार करण्यासाठी त्यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने कडा सपाट करण्यासाठी फावडे वापरले. पण, यानंतर हत्तीच्या पिल्लाने कशी प्रतिक्रिया दिली एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

बाहेर काढल्यानंतर, हत्तीचे पिल्लू जेसीबी मशीनकडे गेले आणि मशीनला मिठी मारण्याच्या प्रयत्नात सोंडेने स्पर्श केला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @WeatherMonitors या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘५० तासांनंतर हत्तीच्या पिल्लाला काढलं बाहेर” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे आणि वन अधिकाऱ्यांचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसत आहेत .