Video Shows Elderly Couple Dancing In Garden On Romantic Song : अनेक वृद्ध जोडपी आपल्याला गार्डमध्ये व्यायाम करताना, बाजारात भाजी आणायला जाताना तर कधी मंदिरात तर कधी फेरफटका मारताना दिसतात. त्यांना पाहून आपलेही नाते इथपर्यंत टिकावे अशी इच्छा नकळत मनात येते. पण अशा सगळ्याच लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत नाहीत आणि ज्या होतात त्या सगळ्यांचेच मन जिंकून घेतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने सगळ्यांना वेड लावून सोडले आहे.

व्हायरल व्हिडीओ गार्डनचा आहे. एक मित्रांचा ग्रुप आतिफ असलमचे ‘बोल’ चित्रपटातील रोमँटिक ‘होना था प्यार’ गाणे गाताना दिसते आहे. मित्रांचा ग्रुप गाणे गात असताना एक व्यक्ती त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असते. पण, या व्हिडीओत गाण्याबरोबर एक खास दृश्य सुद्धा रेकॉर्ड होते. मुलांचा ग्रुप गाणे गात असताना त्यांना न थांबवता एक वयस्कर जोडपे त्यांच्यात नकळत सामील होताना दिसतात. आजोबा गाण्यांच्या बोलावर आजीबरोबर डान्स करण्यास सुरुवात करतात.

या जोडप्याने सगळ्यांना लाजवले (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, वृद्ध जोडपे गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेले असतात. यादरम्यान मुलांचा एक ग्रुप गाणे गात असतात. आजोबाना हे गाणे ऐकून आजीबरोबर डान्स करण्याची कल्पना सुचते. मग ते लगेच आजीचा हात हातात घेऊन डान्स करताना दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर तिथे उपस्थित अनेक जोडप्यानं आश्चर्य वाटते. काही जण तर अक्षरशः थांबून त्यांचा आवर्जून स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ सुद्धा काढताना दिसतात, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ गायक आदित्य चौहान @adityachauhanmusic यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला ९ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ‘मला आशा आहे की, जर प्रेम मला मिळाले तर ते असेच मिळूदेत’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून ब्युटी ब्रँड Nykaa म्हणाले की,’ सिंगल असो किंवा रिलेशनशिपमध्ये या जोडप्याने सगळ्यांना लाजवले’, तर दुसरा म्हणतोय की, ‘मी त्यांना एकदा दिल्ली मेट्रोमध्ये पहिले होते. ते नेहमी एकमेकांच्या बरोबर असतात. त्यामुळे मला खरोखरच अशी इच्छा आहे की, ही पिढी त्यांच्याकडून प्रेरणा घेईल’ , ‘आपल्या नात्यात हा सुंदर टप्पा यावा’ ; आदी अनेक कमेंट्स केल्या आहेत.