Desi Jugaad Viral Video : काही लोकांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते. ते रद्दीतूनही आश्चर्यकारक गोष्टी बनवू शकतात, त्यामुळे आपण सगळेच जण त्यांचे टॅलेंट पाहून थक्क होऊन जातो. अनेकदा या टॅलेंटला आपण देशी जुगाडदेखील म्हणतो. देशी जुगाड करून बनवलेल्या अनेक गोष्टी तुम्ही आजवर पाहिल्याच असतील. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये तीन मित्रांना एकत्र प्रवास करायचा असतो, म्हणून ते एक जबरदस्त जुगाड करतात. काय आहे हा जुगाड, बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. रस्त्याकडेला मोठमोठे बॅनर लावले जातात. त्यापैकी एका बॅनरचा तरुणांनी ही अनोखी गाडी बनवण्यासाठी वापर केला आहे. दोन सायकल घेण्यात आल्या आहेत. या दोन्ही सायकलच्या मागच्या चाकांना बांबू लावून एक बॅनर उभारण्यात आला आहे आणि सायकल चालवताना ऊन लागू नये म्हणून पुठ्ठादेखील जोडण्यात आला आहे. कशाप्रकारे तीन मित्रांनी एकत्र प्रवास करण्यासाठी जुगाड केला आहे, व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसात ब्रश अन्…VIRAL VIDEO पाहून डोळ्यासमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’

व्हिडीओ नक्की बघा…

मजेशीर जुगाड

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, काही तरुणांनी मिळून दोन सायकलपासून एक छान गाडी तयार केली आहे. तीन मित्रांना एकत्र प्रवास करता यावा म्हणून हा देशी जुगाड करण्यात आला आहे. ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बॅनर, तर तिघांनाही बसता यावे म्हणून दोन्ही सीटला जोडून एक फळी लावण्यात आली आहे. दोन मित्र सायकल चालवत आहेत आणि तिसरा मित्र प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे. असा हा तिन्ही मित्रांनी मिळून देशी जुगाड केला आहे, ज्याचे तुम्ही नक्कीच कौतुक कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kumarappu420 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तीन मित्रांचा ग्रुप हा सगळ्यात बेस्ट मानला जातो. एक खूप बोलणारा, दुसरा शांत ऐकून घेणारा, तर तिसरा आपल्याच विश्वात असतो. असा हा तीन मित्रांचा ग्रुप अगदीच मजेशीर असतो; तर आज या तीन मित्रांनी मिळून एक मजेशीर जुगाड केला आहे आणि दोन सायकलवरून तीन मित्रांनी प्रवास केला आहे. नेटकरी हा जुगाड पाहून त्यांच्या मैत्रीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.