Video Shows Girls Taking Care Of Elderly Couple : आई-वडील मुलीच्या संगोपनात कोणतीच कमतरता ठेवत नाहीत. तिच्यासाठी सुरक्षित वातावरण, तिला अगदी राजकुमारीसारखे वाढवतात. मग मुली जेव्हा मोठ्या होतात, स्वत:च्या पायांवर उभे राहतात, त्यांचे लग्न होते तेव्हा उतारवयातील आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारतात आणि त्यांना कोणती गोष्ट कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे एखादे मूल नसलेले जोडपे जरी त्यांना दिसले तरीही त्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हयरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती कळू शकलेली नाही. पण, एक आजी रस्त्याकडेला बसलेली दिसते आहे. हे पाहून तिच्या शेजारी उभी असणारी एक मुलगी त्यांच्या खांद्यावर मायेने हात ठेवते. हे पाहून त्या आजीच्या डोळ्यांत पाणी येते आणि मुलगीदेखील भावूक होते. ती आपल्या मैत्रिणींना घडलेला सर्व प्रकार सांगते आणि दुसऱ्या दिवशी त्या मुली आजीचे घर शोधण्यास सुरुवात करतात. नक्की या मुली काय करतात ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

‘काही मुली अशाही असतात’

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, सगळ्या मुली बहुतेक नर्स किंवा डॉक्टर होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. कारण- त्यांनी पांढऱ्या रंगाचा कोट घातलेला दिसतो आहे. त्या सगळ्या मुली मिळून आजीचे घर शोधतात. त्यानंतर घरी जाऊन त्या आजीला अंघोळ घालतात. तिला नवीन मॅक्सी घालतात आणि वॉकर हातात देतात. काही मुली स्वतःच्या हातांनी आजीला जेवण भरवतात, नंतर त्यांच्या घराची साफसफाई, भांडीसुद्धा घासून देतात. हे सगळे पाहून आजी आणि आजोबा दोघेही भावूक होतात आणि मुलींनाही रडू कोसळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजोबा मुलींसाठी टाळ्या वाजवतात; तर आजी त्यांना आशीर्वाद देतात आणि इथेच व्हिडीओचा गोड शेवट होतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_its___lovely या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘काही मुली अशाही असतात’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून मुलींच्या कृतीचे वेगवेगळ्या शब्दांत कौतुक करीत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.