Video Shows Girls Group Dance On Ek Numbar Tuzi Kambar Song : सोशल मीडियावर एखाद्या गाण्याचा ट्रेंड सुरु झाला की, मग अनेकांना त्याच्यावर रील बनवण्याचा मोह आवरत नाही. त्यातच गुलाबी साडीनंतर संजू राठोडचं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला सगळ्यांनीच खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाण्यावर लहान मुलांपासून ते अगदी मोठ मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण रिल्स बनवताना दिसले आहेत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर चिमुकल्यांनी जबरदस्त डान्स केला आहे.

बर्थडे पार्टी म्हंटल की, केक कापणे, गिफ्ट देणे आणि डान्स करणे या गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. अशातच अशा एखाद्या पार्टीत मित्र-मैत्रिणींबरोबर डान्स करण्याची मजा काही वेगळीच असते. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये काही चिमुकल्या मिळून एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर डान्स करत आहेत. चिमुकल्यांनी स्वतःचा एक वर्तुळ तयार करून, गाण्याच्या बोलावर हुबेहूब स्टेप्स करताना दिसत आहेत; जे पाहून तुमचेही पाय थिरकतील एवढे तर नक्की…

जेव्हा सगळ्या मैत्रिणी एकाच डान्स क्लासला जाता (Viral Video)

एखाद नवीन गाणं आलं की, त्यावर डान्स क्लास किंवा अगदी बिल्डिंग मधल्या सगळ्या मैत्रिणी मिळून डान्स करण्याचे क्रेझ वेगळेच आहे. पण, यामध्ये एक जण स्टेप विसरतो तर एक जण मस्ती करून पूर्ण डान्सची मजा घालवतो. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एक नंबर तुझी कंबर गाण्यावर चिमुकल्यांनी डान्स करून सगळ्यांनाच मागे टाकले आहे. कोणतीही चूक नाही किंवा कोणी स्टेप विसरलं नाही ; सगळ्याच अगदी उत्साहाने न चुकता डान्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sanchi_s1111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “जेव्हा सगळ्या मैत्रिणी एकाच डान्स क्लासला जातात”, “सगळ्याच मुली खूप हुशार आहेत. प्रत्येक स्टेप्स त्यांची अचूक आहे”, “कदाचित या एकाच डान्स क्लासमधील किंवा एकाच सोसायटीमधून असतील. कारण – त्यांनी गाण्याचा स्टेप्सचा भरपूर सराव केलेला दिसतो आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.