Elephants And Caretaker Emotional Reunion : प्राण्यांच्या मनात भावना असतात याबद्दलची जितकी उदाहरणे द्यावी तितकी कमी आहेत. प्राणी जरी मुके असले तरीही ते संध्याकाळी दाराकडे बघत मालकाची वाट पाहतात. घरी एखाद्यावर कोणी ओरडलं, तरी त्याला चाटून त्याचे लाड करणे आदी अनेक भावना ते त्यांच्या हालचालींतून मांडत असतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये हत्तींचा कळप त्यांच्या काळजीवाहकाला पाहून लहान मुलांसारखे धावत आले आहेत; जे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
सेव्ह एलिफंट फाउंडेशनच्या संस्थापक लेक चायलर्ट यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. लेक चायलर्ट यांनी वर्षानुवर्षे हत्तींच्या कळपाला आपल्या मुलांप्रमाने सांभाळले आहे. काही दिवस हत्तींच्या कळपापासून दूर राहिल्यानंतर लेक चायलर्ट उद्यानात परत येताना दिसत आहेत. हे पाहताच हत्ती त्यांच्या काळजीवाहकाकडे धावत येतात, सोंडेने तिला हळुवारपणे मिठी मारतात. एवढेच नाही, तर काळजीवाहकाच्या भोवती वर्तुळ तयार करून खेळू लागतात.
खरे प्रेम असेच दिसते (Viral Video)
तुम्ही पाहिले असेल की, काळजीवाहक महिला जेव्हा खूप दिवसांनी घरी परत येते. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ती तिच्या हत्तीच्या कळपाला भेटायला जाते. आपल्या काळजीवाहकाला पाहताच हत्ती तिच्या दिशेने पळत येतात आणि मग तिच्याभोवती वर्तुळ करून, तिला उचलून घेतात, सोंडेने मिठी मारतात. तुम्ही पाहू शकता की, प्रत्येक हत्ती काळजीवाहकाच्या प्रति आपले प्रेम व्यक्त कारण्यासाठी उत्सुक दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा प्रेमळ व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lek_chailert या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “बरेच दिवस घरापासून दूर राहिल्यावर जेव्हा जेव्हा मी घरी परत येते तेव्हा तेव्हा माझं स्वागत असं प्रेमानं केलं जातं. हत्ती माझ्या कुटुंबापेक्षा जास्त जवळचे आहेत. त्यांच्यामुळेच आज मला उभे राहून लढण्याची ताकद मिळाली आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “तुम्ही मोबाईलवरून त्यांच्या भावना अनुभवू शकता. खरे प्रेम असेच दिसते”, “ते ज्या पद्धतीने तिच्याकडे धावत आले, ते खूपच सुंदर आहे”, “हत्ती तिच्यावर खूप विश्वास ठेवतात. ती त्यांचे जग आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.