वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगावी लागते. रहदारीच्या रस्त्यावर वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते अन्यथा तुम्ही स्वत::बरोबर इतरांचा जीव देखील धोक्यात जाऊ शकतो. अनेकदा वाहन चालक नियम पाळण्याचा कंटाळा करतात किंवा टाळतात. वेगावरील नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते, वेगावरील नियंत्रण सुटले तर भयानक अपघात होतात. अशा घटनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुमची ही एक चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकते हे कधीही विसरले नाही पाहिजे. याचीच प्रचिती देणारा एक थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका दुचाकी अपघातामुळे इतर चार दुचाकीचे अपघात होतात.व्हिडिओ सुरू होतो जेव्हा काही दुचाकीस्वार सिग्नलवर दिवा हिरवा होण्याची वाट पाहत असतात. हिरवा दिवा लागताच सिग्नलवर वाट पाहणाऱ्या दुचाकी आणि स्कूटर हळू हळू पुढे जातात ते थोडे पुढे गेल्यावर, होंडा एक्स पल्स चालक सुसाट वेगाने अचानक मागून वेगाने येतो ज्यावर दोघेजण बसलेले असतात. पण अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटते आणि तो एका काळ्या रंगाच्या स्कूटरला धडकतात ज्यावर एक पुरूष आणि एक महिला होती. धडक इतकी जोरदार होती की सर्वजण तिथेच खाली पडतात.

अपघात तिथेच संपत नाही. ऐन रहादारीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू असतानाच अपघात झाल्याने होडा बाइक आणि स्कुटर रस्त्यावर धावणाऱ्या इतर दुचाकीला जाऊन धडकतात ज्यामुळे एकापाठोपाठ एक चार दुचाकी रस्त्यावर कोसळतात आणि त्यावरील दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात आपटतात. एका पादचाऱ्याला देखील स्कूटरची धडक बसणार होती पण तो थोडक्यात बचावतो. हा सर्व अपघात रस्त्यावर धावणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना स्लो मोशनची असल्याचे देखील दिसून येते. अपघातामध्ये सहा जण जखमी झाल्याचे समोर आल आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर “क्रॅशेसची मालिका! येथे एक व्हिडिओ आहे जो दाखवतो की, बेपर्वा ड्रायव्हिंगमुळे अपघात कसे होतात आणि निष्पाप लोकांना कसे त्रास होतो! शेवट चुकवू नका आणि या माणसासारखे होऊ नका!” या कॅप्शनसह शेअर करण्यात आला.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अपघात घडवणाऱ्या बाईकरला “छपरी” असे संबोधून व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली. एका वापरकर्त्याने म्हटले की, “दुचाकी चालकांची समस्या अशी आहे की, डावीकडे खूप जागा असूनही ते नेहमीच उजवीकडे येऊ इच्छितात. ट्रॅफिक लाइट आणि स्पीड ब्रेकर ओलांडल्यानंतर हे वर्तन अधिक होते.”

दुसरा वापरकर्ता म्हणाला, “यानंतर, हा हरामखोर स्वतःला रायडर म्हणतो, त्याला सुरक्षितपणे बाईक कशी चालवायची हे माहित नाही, तो स्वतःचा आणि इतरांचाही जीव घेईल आणि स्कूटरवरील माणसाचे मत नाकारत आहे, जरी त्याने हेल्मेट घातलेले नसले तरी आणि तिप्पट वेगाने गाडी चालवत असला तरी.”