Video Shows Husbands Search His Missing Wife In Hospital : हॉस्पिटल, मॉल किंवा एखाद्या अनोख्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेकदा लहान मुले, वृद्ध माणसे किंवा अगदी तरुण मंडळी सुद्धा हरवतात. आपल्या बरोबर असणारी व्यक्ती हवरली आहे हे आपल्याला कळेपर्यंत दोन्ही माणसे वेगवेगळ्या दिशांना गेलेली असतात. मग ती व्यक्ती भेटेपर्यंत आपला जीव कासावीस होऊन जातो आपल्याला काय करायचे हे सुचत नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या नवरा-बायको बरोबर सुद्धा असेच घडले आहे.
व्हायरल व्हिडीओ हॉस्पिटलचा आहे.यामध्ये नवरा आपल्या बायकोला शोधताना दिसतो आहे. याबद्दलत्यांनी हॉस्पिटलमधील गार्डला माहिती दिली. त्यानंतर गार्डने त्यांना समजावले आणि कम्युनिटी हॉलमध्ये बसण्यास शांतपणे बसण्यास सांगितले. पण तरी ते काळजीपोटी आणि आपली बायको लवकर भेटूदेत अशी अशा ठेवून इकडे-तिकडे तिला शोधत असतात . त्यानंतर त्यांनी तिचे नाव माईकवर अनांउन्स करण्यास सांगून आणि बायकोचा फोटो सुद्धा रिसेप्शनवर दिला. त्यानंतर काही वेळाने अखेर त्यांची बायको भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे दृश्य दिसते आणि मग ते तिला घेऊन हॉस्पिटल बाहेर पडले.
जेव्हा आवडती व्यक्ती तुमच्या नजरेपासून होते लांब (Viral Video)
बायकोशी दररोज भांडणारा नवरा काही मिनिटे तिच्यापासून लांब गेल्यावर अगदी बेचैन झालेला दिसला. हॉस्पिटलमध्ये उपस्थित इन्स्टाग्राम युजर @inspo___lah ने हे सगळे दृश्य पहिले आणि मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ शूट करून घेतला अंडी घडलेला सर्व प्रसंग कॅप्शनमध्ये आणि व्हिडीओत मजूकर टाकून लिहिला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @inspo___lah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने ‘माझ्या आईवडिलांबरोबरही १५ वर्षांपूर्वी अगदी असेच काहीसे घडले होते. आम्ही नेपाळमधील विराटनगर आय हॉस्पिटलला गेलो होतो. माझ्या डोळ्यांची समस्या थोडी गंभीर होती आणि माझ्या बरोबर बाबा होते. डोळे तपासण्यासाठी जवळजवळ ८ तास लागले. आमचे काम झाल्यानंतर, आम्ही आईला शोधण्यासाठी कम्युनिटी हॉलमध्ये गेलो. पण ती तिथे नव्हती. तिच्याकडे फोन नव्हता म्हणून संपूर्ण रुग्णालयात तिला शोधले. माझे वडील रडू लागले आणि तेथील गार्डना सांगण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर सुमारे २ तासांनंतर, आम्हाला ती सापडली. ती इतर रुग्णांसह एका सामान्य खोलीत एका कोपऱ्यात बसली होती. मला तो दिवस अजूनही स्पष्ट आठवतो, जरी मी तेव्हा लहान असलो तरीही’ ; अशी कमेंट सुद्धा केली आहे.