Video Shows Indian Man Cooks Roti And Sabzi In Same Kadhai : जेवण बनवणे म्हणजे एका टास्कपेक्षा कमी नाही आहे. वेगेवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी वेगवेगळी भांडी आपल्याला वापरावी लागतात. भाजी साठी कढई, डाळ बनवण्यासाठी टोप तर पोळी भाजण्यासाठी तवा, भात बनवण्यासाठी कुकरचा आपण सगळेच उपयोग करतो. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही चक्रावून जाल. वेळ वाचवण्यासाठी की, काय माहिती नाही पण एका माणसाने भलताच जुगाड करून एकाच भांड्यात पोळी आणि भाजी बनवली आहे.

सोशल मीडियावर अनेकदा खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी चांगले तर कधी वाईट व्हिडीओ सुद्धा असतात. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्याने स्वयंपाक प्रेमी आणि मीम्स प्रेमी दोघांचेही लक्ष वेधून घेतले आहे. म्हणजेच एका माणसाने वेळ वाचवण्यासाठी आणि कमी वेळात जेवण बनवण्यासाठी भलताच जुगाड केला आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस एकाच कढईत पोळी आणि भाजी बनवताना दिसतो आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

‘ईस्ट ऑर वेस्ट भारत आहे बेस्ट’ (Viral Video)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत माणसाने कढई ठेवली आहे. या कढईत माणसाने मधोमध पीठ लावून ठेवले आहे; जेणेकरून बनवले जाणारे दोन्ही पदार्थ मिक्स होणार नाहीत. तसेच माणूस कढईत उजवीकडे भाजी आणि डावीकडे पोळ्या भाजताना दिसतो आहे. एका हाताने तो भाजी चमच्याने हलवतो आहे तर दुसऱ्या हाताने तो छोट्या छोट्या पोळ्या भाजताना दिसतो आहे, जे पाहून तुम्हाला हा जुगाड खूपच आवडेल. हा जुगाड घरी उपस्थित असणाऱ्या अनोळखी व्यक्तीने शूट करून घेतला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr_umesh0018 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तवा नव्हता म्हणून…’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि ‘जितका गॅस वाचवतो आहेस तितकेच पीठ वाया जाते आहे’, ‘ईस्ट ऑर वेस्ट भारत आहे बेस्ट’, ‘एक तीर दोन निशाणे’ ,’ असे जुगाड फक्त भारतातच होऊ शकतात’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.