Video Shows A guy Carrying His Fractured Friend On Handcart : काही लोकांचे खूप मित्र असतात तर काही जणांचा फक्त एकच जवळचा मित्र असतो. दळणावर डब्बा ठेवायला जाताना ते अगदी संध्याकाळी फेरफटका मारायला जाताना आपण हक्काच्या त्या मित्राला फोन करून बोलवून घेतो आणि त्याच्याच बरोबर जातो. त्यामुळे एक काम असलं तरीही दोन जण बरोबर जाणार हा मैत्रीचा एक वेगळाच निमयच असतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये हॉस्पिटलमधून एक मित्र आपल्या मित्राला घेऊन चालला आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. मित्राला दुखापत झालेली दिसते आहे. त्यामुळे उपचार करण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. मित्राला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालेला दिसतो आहे. पाय फ्रॅक्चर असल्यामुळे मित्राला चालत येत नव्हते. मग आपल्या मित्राला घरी कसं घेऊन जायचा असा प्रश्न दुसऱ्या मित्राला पडतो. तर यासाठी मित्र नेमकं काय करतो हे व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

खरा साथीदार सुखदुःखातला (Viral Video)

एखाद्या गोष्टीवरून भांडण, कधी वैचारिक मतभेद तर कधी पैशाचे व्यवहारही मैत्री तुटण्याचे कारण बनतात. पण, वाईट परिस्थितीत बरोबर असणारे मित्रच खरे असतात. आज याच गोष्टीचे उदाहरण व्हायरल व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळाले. पाय फ्रॅक्चर झालेल्या मित्राला घरी नेण्यासाठी मित्राने एक हातगाडी आणली आहे. हातगाडीवर त्याला बसवून, स्वतः हातगाडी ओढत, भरउन्हात तो आपल्या मित्राला घरी घेऊन चालला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @maheshpatil551 आणि @rail_reel_girl या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.तसेच ‘हॉस्पिटलमधून मित्राचा पायाचा इलाज झाल्यानंतर घरी घेऊन जाताना दुसरा मित्र… मैत्रीला तोड नाही’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “मित्र रुपात कृष्ण”, “खरा साथीदार सुखदुःखातला” ; आदी अनेक कमेंट्स तर अनेक जण आपल्या मित्रांना कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत.