Video Shows Raining On Wedding Day : अनेक भारतीय परंपरांमध्ये, लग्नाच्या दिवशी पाऊस पडणे हा एक शुभ संकेत मानला जातो. पण, अनेक भारतीय असे मस्करीत सुद्धा म्हणतात की, जेव्हा तुमच्या लग्नाच्या दिवशी पाऊस पडलं की समजून जायचे नवरा किंवा नवरी कढईत नक्कीच जेवले असतील. तर आज अशाच मेसेजसह एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये वरात घेऊन जाताना प्रचंड पाऊस पडलेला दिसतो आहे.

मुसळधार पावसात नवरा लग्नमंडपात जाण्याच्या तयारीत दिसतो आहे. नवरा घोड्यावर बसला आहे आणि जोरदार पाऊस सुद्धा पडतो आहे. त्याच्या आजूबाजूला कुटुंबातील काही सदस्य उभे असतात. घोड्यावर बसलेल्या नवऱ्याच्या डोक्यावर छत्री सुद्धा पकडली आहे; जेणेकरून तो भिजणार नाही. तसेच नवऱ्याचे अनेक नातेवाईक आणि मित्र भिजू नये म्हणून एका संरक्षित जागेखाली उभे असतात आणि नवऱ्या मुलाकडे बघून हसत असतात.

याला कोणी सांगितलं नाही वाटतं (Viral Video)

व्हायरल व्हिडीओ १५ एप्रिलचा आहे. व्हिडीओची सुरुवात प्रथम नवऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून होते. त्यानंतर कॅमेरा हळूहळू नवऱ्या मुलाकडे जातो नवरा मुलगा मात्र गोंधळला दिसतो आहे. हे पाहून लग्नाला उपस्थित मित्र नवऱ्याकडे बघून हसताना दिसत आहेत. तसेच नवऱ्याची उडणारी तारांबळ पाहून त्यांनी या गोष्टीचा व्हिडीओ सुद्धा शूट करून घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by more. (@morethancollabs)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @morethancollabs आणि @souravgujar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सगळ्यात मजेशीर आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ‘अजून कढईत जेव’, ‘काही नाही फक्त मुलगा कढईत जेवायचं’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘डायरेक्ट कूकरमध्ये जेवायचा वाटतं हा एवढा पाऊस पडतो आहे’, ‘याला कोणी सांगितलं नाही वाटतं कढईत नसतं जेवायचे ते’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.