Viral Video: वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, वाहन चालवताना हेल्मेट घाला,असे वारंवार वाहतूक पोलीस नागरिकांना सूचना देत असतात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये सिग्नल बसवण्यात येतात. सिग्नलवर अती घाई करणे किंवा सिग्नल तोडणे प्रत्येक वाहन चालकांसाठी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरते. तर आज सोशल मीडियावर असाच एक बेस्ट बसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बस चालक चुकीच्या दिशेने गाडी चालवताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ मुंबईचा आहे. तसेच फक्त तीन सेकंदाचा या व्हिडीओत एक महिला रस्ता ओलांडून जात असते तितक्यात एक बेस्ट बस सिग्नल तोडून निघून जाताना दिसते आहे. एवढंच नाही तर बस चुकीच्या दिशेने सुद्धा जाताना दिसत आहे. हे पाहून तेथे उपस्थित एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आणि बसचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.

हेही वाचा…सामानाचे नुकसान टाळण्यासाठी अनोखा उपक्रम; विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी केला स्पंज बोर्डचा उपयोग; पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एखाद्या ठिकाणी लवकर पोहचण्यासाठी ही बेस्ट बस सिग्नल तोडून , तसेच एक महिला रस्ता ओलांडत असताना तिच्यासमोरून ही बस वेगात पळ काढताना दिसून आली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी बेस्ट बसचा क्रमांक A-124 आहे. A-214 ही बेस्ट बसत ‘वरळी बस डेपो ते कुलाबा बस स्थानक’ दरम्यान धावते.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @jituk9 या युजरच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी
बेजवाबदारपणे बस चालवणाऱ्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोस्ट करणाऱ्या युजरने स्वतः मुंबई पोलिस, बेस्टच्या अधिकृत एक्स हँडलसह डीजीपी महाराष्ट्र यांच्या अधिकृत हँडलला हा व्हिडीओ टॅग केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या प्रकरणावर वाहतूक पोलिसांनी ‘आवश्यक कारवाई करण्यासाठी कृपया ठिकाणाची योग्य माहिती द्या’ ; अशी कमेंट केली आहे.
त्यानंतर बेस्टने सुद्धा व्हायरल झालेल्या व्हिडीओला प्रतिसाद देत या प्रकरणी अधिकाऱ्यांकडून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन ‘पुढील कारवाईसाठी वरळी डेपो मॅनेजरकडे माहिती पाठवण्यात आली आहे ‘ ; अशी कमेंट केली आहे.