Video Shows Tempo Driver Help To Other’s : दुसऱ्याला मदत केल्यावर पुण्य लाभते असे आपण म्हणतो. पण, आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येक जण आपआपल्या कामात इतका गुंतलेला असतो की, आपण कसे पुढे जातोय फक्त याच गोष्टीची सगळ्यांना चिंता असते. पण, काही लोक असे असतात की, अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष देतात. तर आज सोशल मीडियावर अशाच माणुसकीचे दर्शन घडले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत प्रवासादरम्यान सगळ्यांची मदत करण्यासाठी ड्रायव्हरने खास पाऊल उचलले आहे.
व्हायरल व्हिडीओत रस्त्यावरून अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. तितक्यात अचानक पाण्याचा लोंढा आला आणि रस्त्यावर पाणी जमा होऊ लागले. पाण्याचा प्रवाह पाहून काही दुचाकी चालकांना गाडी पुढे घेऊ जाणे शक्य नव्हते. पाण्याचा प्रवाहाला थांबवता आले नसले तरीही कदाचित पूर्ण रास्ता तुडुंब भरून गेला असता आणि इतरांनाही तिथून जाणे शक्य झाले नसते. मग हे पाहून तेथून जाणाऱ्या ड्रायव्हरने सगळ्यांची समस्या सोडवून टाकली आणि काय केलं ते पाहा.
खरंच माणुसकी दाखवली या ड्रायव्हरने (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, अचानक पाण्याचा लोंढा आल्यामुळे सर्व प्रवासी थक्क झाले आहेत. कोणीही प्रवाहाच्या दिशेने जायला तयार नाही. पण, ड्रायव्हरने हुशारी दाखवून पाण्याचा प्रवास रोखण्यासाठी त्याचा ट्रक पाण्याच्या प्रवाहाच्या इथे उभा केला. जेणेकरून रस्ता तुडुंब भरणार नाही आणि इतर प्रवाशांनाही सुखरूप गाड्या चालवता येईल; जे अगदीच कौतुकास्पद आहे. स्वतःवर संकट ओढून दुसऱ्यांना मदत करणे फार कमी लोकांना जमते. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा… (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @attitude_marathi_dialogue_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “याला म्हणतात सर्व दुःख स्वतःवर घेणे आणि दुसऱ्याचं भलं करणे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून ड्रायव्हरचे कौतुक करत आहेत. “सर्व ड्रायव्हर चुकीचे नसतात तुम्ही त्याचा आदर करत जा”, “हे जग खूप सुंदर आहे. अजून सुंदर बनवूया खरंच माणुसकी दाखवली या ड्रायव्हरने ग्रेट दिल से सॅल्यूट…”, ” मानल राव भाऊला”, “माणसाने शक्य होईल तेवढं चांगलं वागलं पाहिजे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.