scorecardresearch

Viral Video: मुलीने स्कूटी सुरु करताच झालं असं काही की, पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!

हा मजेदार सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी त्याला लाइक केले आहे.

girl funny video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: black_lover__ox / Instagram)

सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओनी भरलेले आहे. येथे दररोज हजारो लाखो व्हिडीओ पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यापैकी काही इतके मजेदार असतात की आपल्यलाला, मला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ स्कूटी चालवणाऱ्या मुलीशी संबंधित आहे. पण फ्रेममध्ये असं काही बघून हसू आवरत नाही. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी त्याला लाइक केले आहे.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

नक्की काय झालं?

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून घराबाहेर अंगणात स्कूटी उभी असल्याचे समजते. जवळच कपडे सुकत आहेत. तेवढ्यात एक मुलगी स्कूटी चालवायला तिथे पोहोचते. आता फ्रेममध्ये जे काही दिसत आहे ते खूप मजेदार आहे.मुलीने स्कूटी सुरू करताच लगेच पूर्ण रेस दिल्याचे दिसून येते. त्यामुळे स्कूटीवरील व मुलीचे नियंत्रण बिघडले आणि उन्हात वाळायला ठेवलेल्या कपड्याच्या स्टॅडसह पुढे जाते. काही अंतर गेल्यावर मुलगीही स्कूटीसह खाली पडल्याचे दिसून येते.

( हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा… )

( हे ही वाचा: अंकिता लोखंडेला साखरपुड्यात आली सुशांत सिंग राजपूतची आठवण; व्हिडीओ व्हायरल )

इन्स्टाग्रामवर black_lover__ox नावाच्या पेजवर व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video something happened as soon as the girl started the scooty you cant stop laughing ttg

ताज्या बातम्या