Viral Video: प्रत्येकाच्या जीवनात पुढच्या सेकंदात काय होईल याचा काही नेम नसतो. भविष्यात आपल्यासाठी काय लिहून ठेवलं असेल याचाही अंदाज आपण लावू शकत नाही. अनेकदा नकळत अशा गोष्टी घडत असतात; ज्यावर आपला विश्वास बसत नाही. तर याचं एक उदाहरण आज सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओत एका महिला मोठी दुर्घटना होण्यातून वाचली आहे.

वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक दृश्य कैद झालं आहे. महाविद्यालयामधील विद्यार्थी वर्गात बसलेले असतात. अनेक जण मोबाईलमध्ये बघून काही तरी पेपरवर उतरवताना दिसत आहेत. तितक्यात वर्गातील एक विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी बाकावरून उठते आणि तितक्यात छतावर लावलेला पंखा खाली पडतो. एकदा बघाच हे थरारक दृश्य…

हेही वाचा…ऑफिसला उशिरा जाण्यासाठी तरुणानं शोधला भन्नाट जुगाड; VIDEO शेअर करीत दिलं ‘हे’ कारण

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ज्या क्षणी विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी बाकावरून उठते तितक्यात छतावर लावण्यात आलेला पंखा खाली कोसळतो. अचानक घडलेली ही घटना पाहून त्या विद्यार्थिनीबरोबर वर्गातील उपस्थित सर्वच विद्यार्थी घाबरून जातात. पण, सीसीटीव्ही फुटेजनुसार सुदैवाची बाब अशी की, कोणालाही यादरम्यान दुखापत झालेली नाही.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @ghanshaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘जेव्हा तुमचा दिवस भाग्यशाली असतो’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून थक्क झाल्याचे त्यांच्या कमेट्सवरू स्पष्ट होत आहे. तर काही नेटकरी ही घटना घडली तेव्हा व्हिडीओतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या हावभावांवरून कमेंट्स करताना दिसत आहेत.