देशाची राजधानी दिल्लीत ५६ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर कार चढवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमवारी दिल्लीतील आदर्श नगरमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची कार अचानक उजवीकडे वळली आणि आपल्या सात वर्षांच्या नातवाला हातात घेऊन जात असलेल्या व्यक्तीवर जोरात धडक दिल्याचे दिसत आहे.

सकाळी १०:११ च्या सुमारास, रस्त्याच्या डाव्या बाजूने रस्त्यावरून चालत असलेल्या या व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या ह्यूंडाई सॅन्ट्रोने धडक दिली. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. तरुण चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्यावरून जाताना दिसते. आजोबांच्या हातातील नातू गाडीच्या चाकाखाली अडकला आणि काही अंतरापर्यंत गाडीसह फरफटत गेला आणि कारने रस्त्यात येणार्‍या प्रत्येकालाधडक दिली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, राजेश कुमार कामरा असे या व्यक्तीचे नाव आहे आणि त्याचा नातू मन्नत या अपघातात जखमी झाला आहेत.

१७ वर्षी मुलगा चालवत होाता कार

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, १७ वर्षांचा मुलगा गाडी चालवत होता. काही सेकंदातच, सॅन्ट्रोने प्रथम पार्क केलेल्या पांढऱ्या स्कूटीला धडक दिली, त्यानंतर राजेश कुमार कामरा, त्यानंतर रस्त्यावर एका कोपर्‍यात उभे असलेले चार लोकांनाही धडक दिली. जखमी मुलाची आई मदतीसाठी ओरडताना ऐकू येते.

हेही वाचा – ‘चिकन टिक्का चॉकलेट’ बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून संतापले नेटकरी, “याला तुरुंगात टाका”

आजोबा आणि नातवाला उडवले

स्कूटर जमिनीवर पडली तर दुचाकीस्वार काही मीटर अंतरावर दूर फेकला गेला. कार थांबताच स्कूटरस्वाराने उठण्याची धडपड केली, मात्र राजेश आपला नातू ज्या ठिकाणी अडकला त्या ठिकाणी धावला. त्यांना त्यांचा नातू गाडीच्या मागील चाकाखाली अडकल्याचे दिसून आले. लोकांनी त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. थरारक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा –माणसांना जे समजत नाही ते प्राण्यांना कळतं! वाटेत उभ्या व्यक्तीला हत्ती कसा म्हणाला ‘Side please’, पाहा Viral Video

दरम्यान, पोलिसांनी कार ताब्यात घेऊन त्याच्या मालकावर कारवाई सुरू केली, तर १७ वर्षीय तरुणाला पोलिस कोठडी देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९A नुसार, अल्पवयीन व्यक्तीने कोणताही गुन्हा केल्यास, अल्पवयीन किंवा मोटार वाहन मालकाचे पालक किंवा पालक दोषी मानले जातील. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५,०००० रुपये दंड आणि १२ महिन्यांसाठी वाहनाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते.