Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, असं म्हणतात. एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. सध्या अशाच एक भावनिक क्षण दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घरी नवीन पाहुण्याची चाहूल लागली की, होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांपासून ते नातेवाइकांपर्यंत सगळ्यांच्याच मनात मुलगा होणार की मुलगी याची उत्सुकता असते. आपल्याला लेकच व्हावी, असं म्हणणारे फार कमी पुरुष पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बाप आपल्याला लेक झाल्याचे कळताच ढसाढसा रडताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका हॉस्पिटलमध्ये बाळाच्या जन्माची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या घरी लेक जन्माला आल्याचं कळतं. यावेळी लेकीचा बाप ढसाढसा रडायला सुरुवात करतो आणि लेकीला पहिल्यांदा पाहून तिच्या पायाचं चुंबन घेऊन तिच्या पाया पडतो. आपल्या लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या या बापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @cops_santu.neman या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत आठ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि सहा लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरनं लिहिलंय, “माझा आजच्या दिवसातला बघितलेला सगळ्यात सुंदर व्हिडीओ. खरंच डोळ्यांत पाणी आलं बघून…” तर आणखी एकानं लिहिलंय, “तुमच्यासारखा बाप मुलीला मिळाला, तर कधीच दु:खी नाही राहू शकत ती”. तर आणखी एकानं लिहिलंय, “इतका प्रेम करणारा बाप मिळाला म्हणजे मुलीला तिच्या पूर्ण जीवनात कोणतीच कमतरता नसणार”. आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “काटे आले भावा अंगाला व्हिडीओ पाहून. अभिनंदन भावा”.