Trending tiger Video: वाघ हा भयानक प्राण्यांपैकी एक आहे. त्याला पाहून भल्याभल्यांचा घाम फुटतो. त्याच्या समोर जाण्याचे कोणीही धाडस करत नाही आणि जर गेलाच तर त्याची काही खैर नसते. वाघासंबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून नक्कीच तुम्हाला धडकी भरेल. एक महिला आनंदाच्या भरात चक्क वाघाखाली झोपल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र त्यानंतर वाघाने जे काही केलं ते देखील एकदा पाहिलंच पाहिजे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगी खूप खूश दिसत आहे आणि ती आनंदाच्या भरात एका भयानक वाघापर्यंत पोहोचते. ती धाडस करत वाघाकडे जाते आणि चक्क वाघाच्या खाली जाऊन झोपते. खरं तर वाघाच्या जवळ जाण्याचीही हिंमत कोणी करत नाही. मात्र या महिलेने केलेले धाडस पाहून अनेकांना घाम फुटला आहे. तुम्ही देखील ही महिला वाघाखाली कशी झोपली ते एकदा पाहाच.

( हे ही वाचा: अबब! अजगराने फक्त काही सेकंदात हरीणाला संपूर्ण गिळले; Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल)

महिला वाघाखाली कशी झोपली त एकदा पाहाच

( हे ही वाचा: Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलत होता कविता अन् तितक्यात निसटली पँट; आणि मग…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० सेकंदाचा हा व्हिडीओ tiger bigfan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करत आहे. फोटो काढण्यासाठी या महिलेने वाघाखाली जाण्याचे धाडस केल्याचं अनेकांनी म्हटलंय. तर अनेकांनी या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलंय.