Tourist Bargains Skill Viral Video : कॉलेजला जाणारी प्रत्येक तरुणी, कामावर जाणारी महिला व घर सांभाळणारी गृहिणी या प्रत्येक महिलेमध्ये ‘बार्गेनिंग पॉवर’ ही असतेच. भाजी आणण्यापासून ते अगदी कपडे घेण्यापर्यंत अगदी काहीही खरेदी करा; बार्गेनिंग केल्याशिवाय त्या कोणीच घरी येत नसतात. मग मित्र-मैत्रिणी किंवा घरच्यांसमोर येऊन ‘मी ही वस्तू फक्त इतक्या इतक्या रुपयांना आणली’ असे ऐटीने सांगतात आणि मग इतर कोणी त्यावर दाद दिली नाही तरी स्वतः स्वतःची पाठ कौतुकानं थोपटून घ्यायला चुकत नाहीत. पण, आज सोशल मीडियावर एका परदेशी महिलेची ‘बार्गेनिंग पॉवर’ पाहायला मिळाली आहे.

व्हायरल व्हिडीओ भारतातील आहे. एक परदेशी महिला फेरीवाल्याकडून चिप्सचे पाकीट खरेदी करताना दिसते आहे. त्यानंतर ती एका बॅग विक्रेत्याकडे जाते आणि एका बॅगची किंमत विचारते. तेव्हा विक्रेत्या त्या बॅग किंमत ५०० रुपये असल्याचे सांगतो. त्यानंतर “खरी किंमत सांग”, असं ती परदेशी महिला सहजपणे म्हणते. तेव्हा विक्रेता ४०० रुपये सांगतो. परदेशी महिला तेव्हाही बॅग घेण्यास नकार देते. नंतर तो आणखीन पैसे कमी करून अगदी २०० रुपयांना बॅग द्यायला तयार होतो. त्यानंतर १५० आणि अगदी शेवटी तर तो ती बॅग ५० रुपयांना द्यायला तयार होतो. मग ती परदेशी महिला, “तू, ५० रुपयांची बॅग ५०० ते २०० रुपयांना आहे, असं का सांगत होतास”, असे म्हणते.

५०० रुपयांची बॅग थेट ५० रुपयांना (Viral Video)

अनेकदा भारतातील पर्यटनस्थळी परदेशी पर्यटकांना प्रवेश शुल्क असो किंवा आणखीन काही त्यांना अतिरिक्त शुल्क द्यायला सांगितले जाते. त्यामुळे हे पाहून अनेकदा छोटे-छोटे व्यापारीसुद्धा परदेशी पर्यटकांना लुबाडताना दिसतात. तर आज अशाच प्रकारचा काहीसा प्रसंग घडला. पण, या प्रसंगात एका परदेशी महिलेनं आपल्या जबरदस्त हुशारीचा प्रत्यय दिला. विक्रेत्याबरोबर बार्गेनिंग करून, त्याला बॅगची खरी किंमत सांगायला तिनं भाग पाडलं. याउलट एवढी बार्गेनिंग करूनसुद्धा या परदेशी महिलेनं ती बॅग विकत घेतली का? तर त्याचं उत्तर नाही, असं आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तिनं विक्रेत्याला ५०० रुपयांची बॅग ५० रुपयांना द्यायला तयार केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nativety या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर म्हणतोय, “मी याला स्कॅम म्हणणार नाही. मला खात्री आहे की, तुम्ही अमेरिकेत हीच बॅग जास्त किमतीत खरेदी कराल आणि टीपसुद्धा द्याल”. दुसरा युजर म्हणतोय, “बेस्ट बार्गेनिंग स्किल”. तिसरा म्हणतोय, “स्कॅम? तो विक्रेता फक्त उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.