Killy Paul Dance: जगभरातील रील्स बनवणारे युजर्स नेहमीच ट्रेंडिंग गाण्यांच्या शोधात असतात. विविध देशांतील विविध भाषांच्या गाण्यांवर ते आपल्या हटके पद्धतीने रील्स बनवतात. भारतातील विविध भाषांतील गाणीही सातत्याने चर्चेत असतात; ज्यावर केवळ भारतीयच नाही, तर परदेशातील रील्स स्टारही आवर्जून रील्स बनवतात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर 'गुलाबी साडी', ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ ही गाणी चर्चेत आहेत. दरम्यान, अशाच एका गाण्यावर परदेशातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रील बनवताना दिसत आहे. अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर तमीळ भाषेतील बीस्ट या चित्रपटातील 'अरबी कुथू' गाणे खूप चर्चेत होते. त्यावर अनेकांना रील्स बनवताना आपण पाहिले असेल. दरम्यान, आता या चर्चेत असलेल्या गाण्यावर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. भारतातली विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने 'अरबी कुथू' या गाण्यावरही रील बनवली आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल त्याच्या पारंपरिक वेशात असून त्याने चक्क टी-शर्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे. परंतु, तो डान्स नेहमीप्रमाणे हटके आणि सुंदर पद्धतीने करताना दिसत आहे. यावेळी त्याचे चेहऱ्यावरील हावभाव सुंदर असून, डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून अनेक भारतीय युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: ‘माणुसकी अजूनही जिवंत’… पुरातून वाहून जाणाऱ्या गाईला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक पाहा व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/C-iK5f_N9pu/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किलीभाऊ ऑन रॉक.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “किली तुला खूप खूप प्रेम आमच्याकडून.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “एक नंबर भावा.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.”