Viral Video: या जगात श्रीमंत व्यक्तीच सर्वांत आनंदी, सुखी आहे, असे अनेकांना वाटते. पण, खरं पाहायला गेलं, तर परिस्थिती कशीही असली तरी आयुष्यातील प्रत्येक क्षण जगणारी व्यक्तीच खऱ्या अर्थानं श्रीमंत असते. अनेक जण आपल्याकडे काय नाही, या गोष्टीमुळे आपल्याकडे काय काय आहे, हेच विसरून जातात. पण, असेही अनेक लोक आहेत की, ज्यांना क्षणिक सुखातही खूप आनंद मिळतो आणि ते तो आनंद मनसोक्तपणे जगतात.

सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. अनेकदा असे काही व्हिडीओ आपल्या डोळ्यांसमोर येतात की, जे पाहून आपल्या चेहऱ्यावर नकळत गोड हसू येतं. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय ,जो पाहून अनेक जण आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती एका रस्त्यावरून जात असताना त्यांना तिथे एक महागडी स्पोर्ट्स बाईक दिसते. ती पाहिल्यावर दोघंही त्या बाईकजवळ जातात. सुरुवातीला कोणी आपल्याकडे पाहत तर नाही ना, याची ते खात्री करतात आणि नंतर त्यांच्या फोनमधून बाईकबरोबर फोटो काढतात. यावेळी या दोन्ही व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हा क्षणिक आनंद देणारा क्षण या दोन्ही व्यक्तींसाठी लाखमोलाचा आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @saquib_2929 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ स्वतः त्या बाईकमालकान शेअर केलेला आहे. तसेच त्यानं कॅप्शनमध्ये सर्वांची स्वप्नं पूर्ण होवोत… असं लिहिलं आहे.

हेही वाचा: ‘हत्ती लाडात आला…’ हत्तीने पर्यटकाचे घेतले चुंबन; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं लिहिलंय की, गरिबी एवढी वाईट आहे की, भावाला गाडीला हात लावायाचीदेखील भीती वाटतेय. दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, व्वा! खूप सुंदर हृदयस्पर्शी व्हिडीओ. तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, हेच ते क्षण, जी श्रीमंत व्यक्ती जगत नाही.