Viral Video Village Women’s Reaction On Airport : इथे फोटो काढू का, या माणसाला पत्ता विचारू का, बेधुंद होऊन नाचू का, माझं मत मांडू नका; नको जाऊ देत. लोक काय म्हणतील? असं आपण दिवसातून किती तरी वेळा विचार करून अनेक गोष्टी करायच्या टाळून देतो. इतर लोक सतत आपल्याबद्दल काय बोलतील हा विचार करुन जगलात तर जगण्याचा अर्थच बदलून जाईल नाही का? पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये दोन गावाकडच्या महिला विमानतळ पाहण्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसल्या आहेत.

@rekha_5687 या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेला व्हिडीओत विमानतळावरील निरागस दृश्य पहावयास मिळाले आहे. दोन महिला विमानतळाच्या वेटिंग एरियामध्ये गुडघ्यांवर बसून विमानतळ बघताना दिसत आहेत. कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता त्या दोघीही एकमेकींना विमानतळावरील पहिल्यांदा बघितलेल्या सर्व गोष्टी एकमेकींना गप्पा मारत सांगताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून तेथील प्रवाशांच्या चेहऱ्यावरही नकळत हसू येते.

साधी-भोळी माणसं गावाकडची (Viral Video)

एखाद्या फॅन्सी हॉटेलमध्ये गेल्यावर आपण थोडे टापटीप कपडे घालून, एकदम त्या ठिकाणाला शोभेल असा वागायला सुरुवात करतो. पण, व्हायरल व्हिडीओतील या दोन्ही महिलांनी आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्वीकारणे म्हणजे खरी श्रीमंती असते असे दाखवून दिले आहे; जे पाहून वेटिंग एरियामध्ये बसलेल्या प्रवाशांच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू आणले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rekha_5687 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “गावातील साधी माणसं”, “आम्ही मराठी प्रथम”, “खूप साधी-भोळी माणसे आहेत गावाकडची”, “नातं असा असावं नणंद भावजयचं”, “निरागसता”, “बाकीच्यांची पण इच्छा असते बघायची, पण त्यांची हिंमत होत नाही असं करायची”, “टॉप लेव्हलचा डिस्कशन चालू आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.