Viral Video : पती आणि पत्नी यांचं नातं निखळ आणि मैत्रीपूर्ण असतं. अनेकदा त्या दोघांमधली चेष्टा मस्करी किंवा रुसवे फुगवे हे दोन्ही चर्चेचा विषय ठरतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. पत्नीने पतीसोबत एक प्रँक केला. पतीला तो प्रँक इतका आवडला की पतीने तिला खास उत्तर दिलं या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
नेमकं काय घडलं?
पत्नीने पतीचा फोन घरातल्या स्वयंपाक घरात ठेवला आणि दोघंही टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम पाहात बसले होते. त्यावेळी पत्नीने हळूच त्याच्या मोबाइलवर फोन केला. शीना मेलवाणी यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
व्हिडीओत काय दिसतं आहे?
व्हिडीओत आपल्याला शीना मेलवानी मिश्किलपणे हसताना दिसतात आणि त्या सोफ्यावर आरामात बसल्या आहेत असंही दिसतं. त्या त्यांच्या पतीला हळूच फोन करतात. त्यांचा पती कॅमेरात दिसत नाही पण तो टीव्ही पॉज करतो आणि फोन घ्यायला आतमधे जातो. त्यावेळी शीना त्याला सांगतात येताना माझ्यासाठी स्वयंपाक घरातले वेफर्स घेऊन ये. हे सांगत असताना शीना यांना हसू आवरत नाही. पतीला पत्नीने केलेला हा प्रँक इतका आवडतो तो देखील हसू लागतो. तो म्हणतो एक नंबर, ब्रिलियंट. तुझ्यासाठी मी वेफर्स मी घेऊन येतो. घरात वेफर्स नसतील तर मी खाली जाऊन चिप्स घेऊन येतो. एवढंच नाही तर उद्याचं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मी माझ्या हाताने तयार करणार असं उत्तर शीना यांचा पती त्यांना देतो.
शीना यांच्या पतीच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं
शीना यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक युजर म्हणतो मला प्रँकपेक्षा शीना यांच्या पतीचा रिप्लाय जास्त आवडला, त्याला हा प्रँक इतका आवडला आहे की त्याने थेट स्वयंपाक करायची जबाबदारी घेतली असं आणखी एक युजर म्हणतो. शीना यांच्या पतीची रिअॅक्शन फार फार आवडली असंही युजर म्हणत आहेत. शीना यांच्या पतीने मस्त उत्तर दिलंय. मला तर व्हिडीओ आणि प्रँकपेक्षा त्याचं उत्तरच फार फार आवडलं. शीना यांच्या पतीसाठी ग्रीन फ्लॅग असेही रिप्लाय या व्हिडीओवर अनेक युजर्सनी दिले आहेत. हा प्रँक लोकांना चांगलाच भावला आहे आणि लोकांना शीना यांच्या पतीचं उत्तर जास्त आवडलं आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.