Viral Video Wife’s Emotional Welcome for Labourer Husband : गावाकडची बरीच मंडळी चांगल्या नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात. शहरात त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली असते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शाळेचा आणि घरचा खर्च सुटतो. पण, त्यासाठी त्यांना घरच्यांची साथ सोडून शहरात भाड्याने घर घेऊन राहावे लागते. त्यामुळे मग ही मंडळी दिवसरात्र मेहनत घेतात आणि सणासुदीला मिळेल त्या गाडीत धक्काबुक्की सहन करीत आपल्या घरी आनंद द्विगुणीत करण्यासाठी जातात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिवाळीनिमित्त शहरात कामगार म्हणून ओळखला जाणारा कुटुंबाचा आधारस्तंभ त्याच्या गावच्या हक्काच्या घरी आला आहे. तो येण्याअगोदरच त्याच्या बायकोनं अंगणापासून ते घराच्या उंबरठ्यापर्यंत चादर पसरवून ठेवली आहे आणि त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा पसरवून ठेवल्या आहेत. त्यानंतर नवरा त्या फुलांच्या चादरीवरून चालत उंबरठ्यापर्यंत येतो आणि मग बायको त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालते. त्यानंतर ती त्याचं औक्षणसुद्धा करते. अशा प्रकारे ती नवऱ्याचं अगदी राजासारखं स्वागत करते.

कमावतो तो राजा आणि काळजी घेते ती राणी (Viral Video)

अनेकदा कामावरून थकून आल्यावर घरात शांतता आणि कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू असावं, अशीच इच्छा आपल्या सगळ्यांच्या मनात असते. कारण- कामाचा थकवा, टेन्शन घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून दूर होते. तर, आज असंच काहीसं घडलं आहे. आपल्या गावाकडच्या हक्काच्या घरात वा राजमहालात आपलं राजासारखं स्वागत झालेलं पाहून नवऱ्याच्या चेहऱ्यावरसुद्धा हसू आलं आहे. एकदा बघाच बायकोनं आपल्या नवऱ्याचं कसं स्वागत केलं ते…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @writer_brijesh558_official आणि @innocent_author01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तुमच्या शहरात कामगार म्हटला जाणारा माणूस त्याच्या हक्काच्या घरात राजा असतो’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “जो घरासाठी कमावतो तो राजा आणि जी घराची काळजी घेते, ती राणी असते”, “जनरल डब्यातून धक्काबुक्की सहन केल्यानंतर घरच्यांनी असं केलेलं स्वागत प्रवासाचा सगळा थकवा काढून टाकते”, “तुम्ही कुठेही किती दिवस राहा; शेवटी आपलं घर ते आपलंच असतं”, ‘हीच खरी दिवाळी’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.