Viral Video: सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्स करतात. त्यातील काही युजर्सचे डान्स इतके व्हायरल होतात की, ज्याला दशलक्षांमध्ये व्ह्युज, लाइक्सही मिळतात. मागील काही महिन्यांपासून अभिनेत्री तमन्ना भाटियाचं ‘आज की रात मजा हुस्न का’ हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यावर अनेक युजर्स रील्स बनविताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एका तरुणाचा या गाण्यावरील डान्स खूप व्हायरल होतोय.

हल्लीची तरुण मुले कधी काय करतील ते सांगता येत नाही. अनेकदा कॉलेजमधील समारंभामध्ये सुरू असलेल्या गाण्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेले तरुणही नाचायला सुरुवात करतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण कॉलेजच्या वार्षिक समारंभामध्ये ‘आज की रात मजा हुस्न का’ हे गाणं लागल्यावर बसलेल्या खुर्चीवर उभा राहतो आणि सरळ नाचायला सुरुवात करतो. यावेळी तो बेभान होऊन नाचतो. त्याला नाचताना पाहून आसपास बसलेले इतर तरुणही नाचायला सुरुवात करतात. सध्या त्यांचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by VINAY KUMAR (@vinay_kumar8130)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्सवरील @vinay_kumar8130 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काय नाचला हा भाऊ”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तमन्ना आली त्याच्या अंगात”. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “कडक रे भाऊ कडक”. आणखी एका युजरने लिहिलेय, “काय कंबर हलवतोय हा.”