Abhishek Upmanyu Anushka Sharma & Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आपल्या काही मोजक्या जवळच्या मंडळींसह केक कापून साजरा केला. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर विराट – अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं होतं. विराट- अनुष्काच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर प्रत्येक सेलिब्रिटी वेडिंगनंतर ट्रेंड होत असतात. ‘विरुष्का’च्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत. अनुष्का शर्मा व विराट कोहलीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये एक अगदी अनपेक्षित चेहरा दिसल्याने नेटकरी थक्क झाले आहेत. हा चेहरा म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यु!

मंगळवारी सकाळी अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती विराट कोहलीसह एक सुंदर फोटो पोस्ट केला. त्यांचे मित्र आणि कुटुंबासह आनंद साजरा केला, म्हणूनच त्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यास उशीर झाला. माझ्या नंबर UNO (१) सह, 6+ इन्फिनिटी ऑफ (रेड हार्ट इमोजी), असे कॅप्शन देते अनुष्काने हा फोटो पोस्ट केला होता. तसेच विराट कोहलीने सुद्धा अनुष्कासह एक फोटो शेअर करून एक रेड हार्ट व इन्फिनिटी ईमोजी कॅप्शन दिले होते.

दरम्यान, कॉमेडियनच्या उपस्थितीने चाहत्यांची उत्सुकता इतकी वाढली की काहीच तासात ‘अभिषेक उपमन्यु’ X वर ट्रेंड करू लागला होता. काहींनी तर अभिषेकचा फोटो शेअर करताना त्याच्याच एका स्किटमधला ‘किसीको क्या ही पता चलेगा’ असा स्टिकर सुद्धा शेअर केला आहे.

काहींनी अंदाज वर्तवताना कदाचित अभिषेकने विराट व अनुष्कासाठी एखादं स्किट केलं असेल असंही म्हटलं आहे. अभिषेकला मिळालेली ही संधी भारतीय स्टॅन्ड अप कॉमेडीयन्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे असेही काहींनी कमेंटमध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा<< इंग्लंडचा स्टार खेळाडू सामन्यात चेंडूमागे पळत गेला अन् अचानक आगीची ज्वाळा.. Video पाहून म्हणाल, “बापरे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेक उपमन्युसह या फोटोमध्ये जहीर खान व त्याची पत्नी सागरिका घाटगे सुद्धा दिसत आहेत.