२ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा एका पाकिस्तानी मुलीची झाली जी विराट कोहलीची फॅन आहे. या पाकिस्तानी मुलीने कॅमेऱ्यासमोर विराट कोहली तिचा आवडता खेळाडू असल्याचं सांगितलं. शिवाय यावेळी विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यात एकाला निवडावं लागलं तर कुणाला निवडशील? असं विचारताच तिने ‘विराट कोहली’चं नाव घेतलं होतं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

या मुलीचा व्हीडीओ व्हायरल होताच पाकिस्तानी लोकांनी संताप व्यक्त करत विराट कोहलीची फॅन असणाऱ्या मुलीवर देशद्रोही असल्याचा आरोपही केला. व्हायरल झालेल्या या मुलीचे नाव फिजा असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय ती एक क्रिकेटप्रेमी असून जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तानसामना असतो तेव्हा ती अनेकदा विराटला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येते आणि त्याला उघडपणे पाठिंबा देते. सध्या फिजाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने आपणाला कोणीही भारतात घेऊन जात नसल्याची व्यथा मांडली आहे.

पाहा व्हिडीओ-

“कोणीतरी माझाही सचिन असेल”

नवीन व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणी म्हणते की, “दु:खाची बाब म्हणजे, १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पण मला एकही असा भारतीय सापडला नाही, जो मला म्हणेल की, मी तुला भारतात घेऊन जातो, का??” असा प्रश्न ती या व्हिडीओत विचारताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कोई तो मेरा भी सचिन होगा.” पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरचा भारतीय पती सचिनच्या संदर्भात या पाकिस्तानी तरुणीने असं म्हटल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा- गुटखा खाणाऱ्या सुनेला कंटाळून सासूने केली पोलिसांत तक्रार, म्हणाली “सर्वांना यार म्हणते आणि घरात…”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी तरुणीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘तुम्हीही या.’ तर दुसऱ्या एकाने लिहिलं “वेलकम टू इंडिया” तर एकाने मजेशी कमेंट करताना लिहिलं, “थेट सचिन भाईशी संपर्क करा”