Virat Kohli Hotel Room Viral Video: विराट कोहलीचे कोट्यवधी चाहते आहेत, सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. मैदानातही अनेकदा कोहली क्रेझची प्रचिती येते. मात्र अलीकडेच विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात असणाऱ्या कोहलीला चाहत्यांमुळे फार मनस्ताप सहन करावा लागला. कोहली राहत असणाऱ्या हॉटेल क्रॉउन मधील एका कर्मचाऱ्याने कोहलीच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणानंतर टीम इंडियाच्या व्यवस्थापन समितीने कोहलीला हॉटेलविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला यावर कोहलीने घेतलेला निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

विराटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहलीने स्वतः इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ रिपोस्ट केला होता. यात भलंमोठं कॅप्शन लिहीत कोहली म्हणाला की, “आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसंच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही”.

विराट कोहलीच्या खोलीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हॉटेलकडून रीतसर माफी मागण्यात आली होती, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई केल्याचे हॉटेलकडून सांगण्यात आले होते. मात्र तरीही सुरक्षेच्या व गोपनीयतेचा कारणाने हॉटेल विरुद्ध तक्रार करण्याबाबत कोहलीला विचारणा करण्यात आली होती. द इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या व्यवस्थापन समितीने कोहलीला तक्रार करण्याचे सांगताच त्याने हा विषय तिथेच संपवून टाकू इच्छितो असे सांगितले आहे.

विराट कोहलीच्या रूमचा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तसेच कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिने सुद्धा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. टीम इंडिया सध्या आपल्या पुढील सामन्यासाठी पर्थमध्ये आहे. २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना रंगणार आहे.