भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत विराट कोहली मोबाइलच्या स्क्रीनकडे बघून काहीतरी बघताना दिसतोय. हाच फोटो शेअर करून असा दावा केला जात आहे की, विराट कोहली काँग्रेस खासदार राहुल गांधींची पत्रकार परिषद ऐकत आहे. पण, हा दावा खरा आहे की खोटा सविस्तर जाणून घेऊ…

आमच्या पडताळणीअंती या व्हायरल फोटोबाबत केलेला दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. मूळ चित्रात विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद नव्हे, तर काहीतरी वेगळे पाहत आहे. एडिटिंग टूल्सच्या सहाय्याने विराट कोहलीच्या फोनची स्क्रीन एडिट करण्यात आली असून त्यावर राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे.

काय व्हायरल होत आहे?

व्हायरल फोटोमध्ये विराट कोहली मोबाइलमध्ये पाहत असून स्क्रीनवर राहुल गांधी यांचा चेहरा दिसतोय.

२२ मार्च २०२४ रोजी फेसबुक युजर आश मोहम्मदने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पहात आहे.”

पोस्टची लिंक येथे पाहा

तपास

व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेजद्वारे फोटो शोधला. आम्हाला २१ मार्च २०२४ रोजी विराट गँग नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केलेला मूळ फोटो सापडला. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जिओच्या जाहिरातीचे शूटिंग सुरू होण्याआधी विराट कोहली आराम करताना. त्यावेळी विराट मेकअप रूममध्ये बसून त्याचा मोबाइल पहात होता. विराट कोहली आपल्या मोबाइलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पहात नसून, मोबाइलवर काहीतरी वेगळं पहात असल्याचं चित्रात स्पष्टपणे दिसत आहे.

मूळ फोटो इतर अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवर ( संग्रह लिंक ) याच माहितीसह अपलोड केलेला आढळला . मूळ फोटो दुरून काढण्यात आला आहे, त्यामुळे विराट त्याच्या मोबाइलवर काय पाहतोय हे स्पष्ट होत नाही. तर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये राहुल गांधींचा फोटो अगदी स्पष्ट दिसत आहे. यामुळे विराट कोहलीचा फोटो एडिटिंग टूल्सच्या मदतीने एडिट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पहात नव्हता. मूळ फोटोला एडिट करून मोबाइलमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. चुकीच्या दाव्यासह बनावट फोटो व्हायरल होत आहे.