Visually Train Passenger Singing Video : असं म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला दडलेली असते. कोणाला आपली कला सादर करण्यासाठी योग्य मंच मिळतो. तर, अनेकांकडे कलेची देणगी असूनही त्यांना योग्य मंच मिळत नाही. याच कारणामुळे त्यांना कायम पडद्यामागे राहावे लागते. सध्या अशाच पडद्यामागे राहिलेल्या हरहुन्नरी अंध गायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या कलेला उत्तम दाद दिली आहे. अनेकांनी त्याच्या आवाजाचे आणि अनेकांनी त्याला साथ देणाऱ्या मित्रमंडळींचे कौतुक केले आहे.

चालत्या ट्रेनमध्ये अंध व्यक्तीनं गायलेलं गाणं त्याला त्याच्या अंध मित्रांनी दिलेली साथ हे दृश्य आता अनेकांच्या हृदयात स्थान मिळवीत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या एका कोचच्या विंडो सीटवर बसून एक अंध व्यक्ती बॉलीवूडचे एक हिट गाणं ‘ये तुने क्या किया’ गाताना दिसते. विशेष म्हणजे कोणताही माइक, वाद्याचा वापर न करता तो गायला सुरुवात करतो. यावेळी त्याच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वाजवून त्याला साथ देतोय आणि तोही ट्रेनच्या प्लायफूटवर वाजवून गातोय. यावेळी त्यांना धावत्या ट्रेनमध्ये त्यांनी गाण्याची एक चांगलीच मैफील जमवली आहे. यावेळी त्यांचा हा अंदाज सर्वांनाच आवडला आहे.

या व्हिडीओतून लोकांना एका गोष्टीची आठवण करून दिली की, खऱ्या कलकारच्या प्रतिभेला, कलेला स्टेजची गरज नसते. तो जाईल तिथे आपल्या कलेची एक वेगळी छाप सोडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंध व्यक्तींच्या सुंदर गाण्याच्या मैफिलीचा हा व्हिडीओ @khedkar_harish नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला, तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडिया युजर्स त्यांचे तोंड भरून कौतुक करीत आहे. एका युजरने लिहिले, “सर, मी तुमच्या कलेचा आदर करतो,” दुसऱ्या युजरने लिहिले, “माफ करा भाऊ, मी तुम्हाला फक्त एकच लाइक देऊ शकतो.” तिसऱ्या युजरने लिहिले, “ही आपल्या देशाची, भारताची प्रतिभा आहे. खरोखरच उत्तम संगीत आणि गायन”.