आज काळ खुप बदलला आहे. तंत्रज्ञानाने प्रंचड वेगाने बदलत आहे. मोबाईल, फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉट, हेडफोन्सपासून अनेक गॅजेट आजकाल आपण सर्वच जण वापरतो. एवढचं काय आता जवळपास प्रत्येक घरात मिक्सर, टिव्ही, मोबाईल, कॉप्युटर, मायक्रोव्हेव ओव्हन, वॉशिंग मशिन यांसारखे वस्तू हमखास दिसतात. या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रामुळे आपले रोजचे काम करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वीच्या काळी यापैकी काहीच नव्हते त्यामुळे त्या काळातील लोक स्वत: करत असे. कोणत्याही कामासाठी ते लोक कोणत्याही यंत्रावर अवलंबून नव्हते. अशाच एका आजीबाईंना वॉशिन मशीन पाहून आजींनी गोंडस प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजीबाई वॉशिंग मशीनजवळ बसलेल्या दिसत आहे आणि कुतूहलाने मशिन कसे काम करते पाहात आहे. मशीनमध्ये कपडे धुताना पाहून आजी म्हणतात, “गूरू गूरू गूरू….फिरतंय, आज कालच्या बायकांचे काय नशीब आहे रे. पाणी आणायचं नाही, दळण दळायचं नाही, धुण धुवायचं नाही….हे मशीन पावडरही घेत आहे, पाणी घेत आहे, धुणे धुत आहे, पिळत आहे आणि वाळून मशीम मधून बाहेर येत आहे.”आमच्याच काळात का नव्हत रे असे! आमची टाळू खोल गेली इतकी..नदीवर धुण्याचे ओझे नेऊन, आड्यावरून पाणी आणून, शेतातून जाळणे आणून अन्. रात्रभर दळण करून….आता बघ की, गूरू गूरू गूरू फिरताय (मशीन), त्यातून कपडे काढले की वाळत टाकलं की लगेच वाळतात. आताच्या काळातील बायकांची मज्जा आहे.”

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर aapli_maay नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिल आहे की, वॉशिंग मशीन बघून आजी काय म्हणतेय बघा?”

हेही वाचा –“एक नंबर!”, मिशोने दिली कर्मचाऱ्यांना ९ दिवसांची रजा; कंपनीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. आजीबाईंना वॉशिंग मशीनचं इतकं कौतूक वाटत आहे पाहून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, आजी माय तुम्ही तुमच्या काळात कष्टायचे काम केलीत म्हणूनच तुमचे शरीर एवढे धष्टपुष्ट, तंदुरुस्त आहे. खरचं तुम्ही खूप नशीबवान आहात.”

हेही वाचा – “एक नंबर!”, मिशोने दिली कर्मचाऱ्यांना ९ दिवसांची रजा; कंपनीच्या निर्णयाचं नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

दुसरा म्हणाला की, “अगं आई तू सुदृढ शरीर कमावलं आहेस त्या कामांमुळे.. जे आम्हा आजच्या पिढीकडे नाही गं

तिसऱ्याने कमेंट केली की,” आज्जी तुझाच काळ सुवर्ण काळ होता गं…. तुझ्या हाताला अमृताची चव होती…. तुझ्या कुशीची ऊब आजच्या १० हजाराच्या शालीत पण भेटतं नाही…”

चौथ्याने लिहिले की,” मला आजीचे video खूप आवडतात.. पण माझी आजी २-३ महिन्यपूर्वी सोडून गेली.. या आजीला पाहून माझ्या आजीची खूप आठवण येते रडू येत. खूप इमोशनल होते म्हणून मी follow नाही करत.”

पाचव्याने लिहिले की,”आजी किती निरागस आहे, खरचं सर्वात निरागस पिढी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहाव्याने लिहिले की, “हीच ती शेवटची पिढी…. जी अपार कष्ट करूनही सुखा समाधानाने आनंदात राहिली”