Wildlife Viral Video Lion Tiger: जर सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो तर वाघसुद्धा काही कमी नाही. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, मात्र वाघाचेही जंगलात तेवढेच वर्चस्व असते. सिंहाप्रमाणेच वाघसुद्धा खतरनाक शिकारी आहे. वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत. वाघ आणि सिंह यांची जंगलात आपली अशी एक दहशत असते, त्यामुळे फार क्वचितच वाघ आणि सिंह एकमेकांसमोर येतात. असाच एक वाघ-सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी पूर्णपणे हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात, तर काही व्हिडीओ भयानक हल्ल्याचे असतात. काहीही असले तरी लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात आणि ते शेअरदेखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी विचारात पडले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक थरारक आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. जंगलातील दोन सर्वात खतरनाक प्राणी सिंह आणि वाघ एकमेकांसमोर आले आणि सगळ्यांना वाटलं की आता रणकंदन होणारच; पण जे घडलं त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.
सिंह विरुद्ध वाघ? पण…नेमकं घडलं काय?
व्हिडीओमध्ये दिसतं की, एक वाघ पाण्यात बसून निवांत आराम करत होता. तेवढ्यात एक भला मोठा सिंह हळूच त्याच्या मागे येतो. क्षणभरात दोघेही एकमेकांना बघतात आणि झपाट्याने पुढे येतात. पाहणाऱ्यांना वाटतं, आता भयंकर संघर्ष होणार, पण पुढील दृश्य सगळ्यांना आश्चर्यचकित करतं.
लढाईच्या ऐवजी सिंह आणि वाघ एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि जे केलं ते विश्वास बसण्यासारखं नव्हतं. दोघांनी एकमेकांना अलगद स्पर्श केला, नाक लावलं आणि प्रेमाने एकमेकांशी खेळायला लागले. जणू कित्येक वर्षांपासूनचे सवंगडी असावेत. हे दृश्य पाहून अनेकांनी डोळे चोळले, कारण जंगलात अशा प्रकारची मैत्री फारच दुर्मीळ आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ केवळ मनोरंजक नाही, तर एक मोठा संदेशही देतो की जंगलातही द्वेषाच्या ऐवजी प्रेम आणि विश्वास असू शकतो. नेहमी एकमेकांचे शत्रू मानले जाणारे सिंह आणि वाघ येथे मित्रांसारखे भेटले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यावर अनेक लोकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.