scorecardresearch

Premium

VIDEO : प्रियकराने धोका दिला म्हणून संतापली प्रेयसी, थेट सहाव्या मजल्यावरून रस्त्यावर कपडे फेकले अन्…

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन घरातील सामान खाली फेकताना दिसत आहे.

girl friend and boyfriend fight
प्रियकराने धोका दिला म्हणून संतापली प्रेयसी. (Photo : Youtube)

प्रत्येक नाते हे विश्वासावर टिकलेले असते. एखाद्या व्यक्तीचा विश्वासघात झाला तर त्याला त्याचा खूप त्रास होतो. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये विश्वास महत्वाचा असतो. परंतु सध्याच्या काळात अनेक लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात, ज्याची त्यांना मोठी किंमत देखील मोजावी लागते. याबाबतचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिलेने धोका देणाऱ्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं आहे. शिवाय यावेळी त्या महिलेने असं काही केलं की, जे पाहून आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. कारण या महिलेने घरातील असतील नसतील तेवढी कपडे आणि सामान इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून रस्त्यावर फेकल्याचं पाहायला मिळत आहे. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण न्यूयॉर्कमधील असून येथील एका तरूणीने तिच्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडलं. ज्यामुळे ती खूप संतापली आणि तिने थेट सहाव्या मजल्याच्या बाल्कनीतून प्रियकराचे कपडे आणि इतर वस्तू फेकून द्यायला सुरुवात केली. ही महिला वरुन कपडे आणि वस्तू फेकत असल्याचे व्हिडीओ तेथील एका महिलेने शूट केला जो सध्या व्हायरल होतोय.

sachin tendulkar share post on x about junabai tigress in Tadoba-Andhari Tiger Project
‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान
Fraud online booking tadoba
ताडोबात ऑनलाईन बुकिंगच्या नावाने फसवणूक, एक अटकेत; दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
13 Notice to central government on doctor plea
१३ डॉक्टरांच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस

हेही पाहा – बापरे! लोकांच्या जीवाशी खेळ; तुम्हीही चवीनं नूडल्स खाता? VIDEO पाहून १०० वेळा कराल विचार

व्हिडीओमध्ये इमारतीवरुन कपड्यांचा पाऊस पडल्यासारखे दिसत आहे. शिवाय इमारतीच्या खाली असणाऱ्या रस्त्यावर कपडे पडलेले दिसत आहेत. या महिलेला वरुन कपडे टाकताना पाहून खाली उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ३४ वर्षीय महिलेला फसवणूक करणाऱ्या प्रियकराचा इतका राग आला की तिने रागाच्या भरात त्याचे कपडे फेकून दिले.

व्हिडीओत इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्यांवर फेकलेले कपडे दिसत आहेत. महिलेला रागावलेले पाहून ती बाल्कनीतून उडी मारते की काय अशी भीती लोकांना वाटायला लागली. त्यामुळे खाली मोठ्या संख्येने लोक जमले होते. या लोकांनी लगेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी आले आणि त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक महिला हसत हसत हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये ती म्हणते, “मी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले तेव्हा इथे हे सर्व सुरू होते. या महिलेला खूप राग आला असून ती कपडे आणि सामान खाली फेकत आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When boyfriend was caught cheating his girlfriend did something like this the same clothes were found scattered on the road jap

First published on: 04-12-2023 at 16:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×