Viral video: भाऊ-बहिणीचं प्रेम हे आपल्या आयुष्यातल्या इतर नात्यांपेक्षा नक्कीच खूप वेगळं असतं. तेव्हा बहुतेक घरांमध्ये अशी दृश्यं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील जिथे दोन भाऊ-बहीण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडताना दिसतात. मात्र, एकमेकांसाठी उभे राहण्याची वेळ येते तेव्हा दोघेही मागे हटत नाहीत. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला. इंटरनेटवर लाखो लोकांची मने भावुक करणारा हा व्हिडिओ. व्हायरल होतोय. आपला भाऊ खूप मोठा व्हावा किंवा आपली बहिण आपल्यापेक्षा मोठी व्हावी असं भावा-बहिणींना वाटत असतं. या व्हिडीओतूनही हेच पाहायला मिळत आहे. आपण ज्या विमानानं प्रवास करणार आहे त्याची पायलट आपली बहिणच आहे हे कळल्यावर भावाला झालेला आनंद या व्हिडीओतून पाहायला मिळतंय..हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या भावाची बहिणीची आठवण येईल…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भाऊ विमानात प्रवेश करतो तेव्हाच समोर त्याची बहिण पायलटच्या गणवेशात दिसली. हे पाहून भाऊ खूप खूश होतो आणि बहिणीच्या पाया पडतो आणि बहिणीला मिठी मारतो. आपण ज्या विमानानं प्रवास करणार आहोत त्यांच विमानाची पायलट आपली बहिण आहे हे सरप्राईज पाहून भावाला झालेला आनंद व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. भावाला सरप्राईज देऊन बहिणही खूप खूश झालेली दिसत आहे. यावेळी या भावनिक क्षणाचा व्हिडीओ कुणीतरी कॅमेरात कैद केला आणि आता याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिल्ली मेट्रोत तरुणीचा कारनामा! एवढ्या सुरक्षेतही कसा मिळाला प्रवेश? पाहा Viral व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोघांचा हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. यावर नेटीझन्सनी भावनीक कमेंटस केल्या असून बहिणीच्या प्रेमापुढे काहीच नाही, हृदय हेलावून टाकणारा क्षण, बहिणीच्या कामगिरीचा अभिमान असलेला भाऊ असे लिहीले आहे. या दोघांना पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात.