प्रवाशांचा विमान प्रवास सुखकर व्हावा याची जबाबदारी विमान कंपन्यांची असते; ज्यामुळे विमान कंपन्या प्रवाशांसाठी अनेक चांगल्या सोईसाठी सेवा-सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यात तुम्ही विमानात जाताच एअर होस्टेस तुमचे आनंदात हसतमुखाने स्वागत करतात. शिवाय तुम्हाला काय हवं नको त्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पण एका महिलेबरोबर विमानात अशी काही घटना घडली; जी ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही. महिलेला विमानाच्या सीटवर रक्ताचे डाग दिसेल; पण तिने हे जेव्हा क्रू मेंबरला साफ करण्यास सांगितले तेव्हा तिला अतिशय धक्कादायक उत्तर मिळाले.
क्रू मेंबरने दिले असे उत्तर
संबंधित महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आहे. बिर्गिट अमाइग्बा ओमोरुयी असे या महिलेचे नाव असून पेशाने ती नर्स आहे. तिने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट करीत लिहिले की, जेव्हा तिने क्रू मेंबरला सीटवर रक्ताचे डाग असल्याची तक्रार केली तेव्हा क्रू मेंबरने तिलाच ते डाग साफ करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्वतः ते साफ केले आणि त्याचा व्हिडीओ बनवून एक्सवर शेअर केला.
तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रिय @airtransat मी आता काय बोलू? माझ्या समोरच्या सीटवर रक्ताचे डाग होते. तुमच्या एका फ्लाइट अटेंडंटने मला ते उघड्या हातांनी पुसण्यासाठी कीटकनाशक आणून दिले. कॉमन सेन्सबद्दल देवाचे आभार. मी त्यांच्याकडे हातमोजे मागितले आणि सूचनेनुसार रक्त पुसले.
तिने पुढे उपहासात्मकपणे लिहिले की, पुढच्या वेळी, संपूर्ण विमान साफ करण्यासाठी मला मोकळ्या मनाने कॉल करा; जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. तिच्या या पोस्टवर अनेक प्रवाशांनी आपले अनुभव शेअर केले आहे. काहींनी सांगितले की, त्यांनादेखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता; तर काहींनी सांगितले की, विमानात नेहमी क्लिनिंगसाठी स्वत:चे सामान घेऊन जावे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर विमान कंपनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. तक्रारीवरून कंपनीने संबंधित महिला प्रवाशाची माफी मागून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही, तर भविष्यात असे होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.