Woman riding a bike with tripple seat Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. कोणतंही सोशल मीडिया अॅप उघडलं की रोज नवनवीन व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांच्या रील्स चर्चेत असतात.

रस्त्यांवर स्टंट करणाऱ्या, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील. यात तरुण मुलांची संख्या अधिक असते. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक महिला ट्रिपल सीट घेऊन अगदी जोशात बाईक चालवताना दिसत आहे.

हेही वाचा… नवरदेव जोमात! हळदीला नवऱ्याने केला भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “काहीही…”

बाईकवर स्टंट करणारा महिलांचा हा व्हिडीओ आपण कदाचित पहिल्यांदाच पाहिला असेल. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळीकडेच आपलं स्थान निर्माण करतायत हे खरंय. परंतु, त्याचप्रमाणे महिला गुन्हेगारी आणि वाईट गोष्टींकडेही वळू लागल्या आहेत हे नाकारणंही तितकं सोप नाही. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ या गोष्टीचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात एक काकी साडी नेसून बाईक चालवताना दिसतायत. या काकींच्या मागे अजून दोन महिला बसल्या आहेत. काकी ट्रिपल सीट घेऊन रस्त्यावर अगदी जोमात गाडी चालवताना दिसतायत.

हेही वाचा… माझ्याशी लग्न कराल का? ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने शिक्षिकेला घातली लग्नाची मागणी; VIRAL VIDEO एकदा पाहाच

कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने या महिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच @cg_jp_editor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून याला “आंटी नंबर १” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर व्हिडीओला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आंटी रॉक ड्रायव्हर शॉक.” तर दुसऱ्याने “महाराष्ट्राची लाडकी बहीण, धूम थ्री रिटर्न.” तर अजून एक जण कमेंट करत म्हणाला, “लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये भेटल्यावर.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… आजीबाईंची फुगडी कमाल! बाप्पासमोर आजीने दणक्यात घातली फुगडी, कोकणातील ‘हा’ VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक