Bride Working on Laptop Wedding Video: करोनानंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या. जगण्याची पद्धत, सवयी आणि अगदी लग्नातलं वागणंही. वर्क फ्रॉम होम हा जणू नवा नॉर्मल झालाय. आता कुठेही, कधीही आणि अगदी लग्नाच्या दिवशीही ऑफिसचं काम करणं थांबलेलं नाही आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे नुकताच समोर आलेला एक व्हायरल व्हिडीओ. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…

सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण- ती लग्नाच्या स्टेजवर बसून लॅपटॉपवर ऑफिसचं काम करताना दिसत आहे. पाहणाऱ्यांना तर वाटलं, हे लग्न आहे की एखादी टीम मीटिंग? या भन्नाट दृश्यानं नेटिझन्सना पुरेपूर हसवलंय.

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट आणि धमाल व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक थांबता थांबता हसत आहेत. सगळीकडे लग्नाचा माहोल, स्टेजवर नवरीबाई… पण तिच्या हातात फुलं नव्हे, तर लॅपटॉप आणि मोबाईल. हो, हे खरं आहे. लग्नाच्या दिवशी नवरी थेट स्टेजवर लॅपटॉप घेऊन ऑफिसचं काम करीत होती आणि तिचा नवरा मात्र शेजारी शांतपणे बसलेला दिसत आहे. हे दृश्य इंटरनेटवर खळबळ उडवत आहे.

वर्क फ्रॉम वेडिंग!

व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसतं की, नवरीनं लॅपटॉप घेऊन काम करतेय. आणि ती मोबाईलवर कुणाशी तरी बोलत आहे, जणू काही ती ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहे. इतकं सगळं सुरू असताना, तिचा नवरा म्हणजेच नवरदेव गुपचूप येऊन तिच्या शेजारी येऊन बसतो… पण मजा तर इथेच आहे. कारण- नवरीचं त्याच्याकडे लक्षच नसतं. ती इतकी कामात गुंतलेली असते की, तिला समजतच नाही की, तिचा नवरा स्टेजवर येऊन शेजारी बसलाय.

लोकं म्हणाले, हे लग्न आहे की मीटिंग?

नवरदेवाचा चेहरा पाहून लोक हसून लोटपोट होत आहेत. त्याचं एक्स्प्रेशन असं आहे की, जणू तो स्वतला विचारतोय, “मुलगी मिळाली की एम्प्लॉयी?” नेटिझन्सनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तिला ‘वर्कहोलिक ब्राइड’ म्हटलं, तर कुणी मजेत लिहिलं, “सैलरी कट नको म्हणून लॅपटॉप लग्नात घेऊन आली का?’, अशा प्रकारे अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @official_niranjan_kgm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, याला हजाराव्यांदा पाहिलं गेलं आहे. कमेंट्समध्ये लोकांनी विनोदांचा पाऊस पाडला आहे.