Year Ender 2023 : वर्ष २०२३ हे वर्ष संपायला अवघे काय दिवस शिल्लक राहिले आहेत. क्रिकेट जगतात वेगवेगळ्या कारणांमुळे हे वर्ष खूप चर्चेत आले; पण आज आपण कोणत्याही कटू आठवणींचा उल्लेख करणार नाही. तर, या वर्षी क्रिकेट विश्वात लग्न झालेल्या सात खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहेत.

मुकेश कुमार – दिव्या सिंह

भारताचा वेगवाग गोलंदाज मुकेश कुमार अलीकडेच लग्नबंधनात अडकला. मुकेशने २८ नोव्हेंबर २०२३ ला दिव्या सिंहशी लग्न केले. दोघांचे लग्न गोरखपूरच्या रिसॉर्टमध्ये पार पडले.

के. एल. राहुल – अथिया शेट्टी

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के. एल. राहुलने २०२३ च्या सुरुवातीला त्याची मैत्रीण अथिया शेट्टीबरोबर लग्न केले. या सुंदर जोडप्यावर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. क्रिकेटर के. एल. राहुलने २३ जानेवारीला बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नगाठ बांधली. राहुल – अथियाचे लग्न अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर पार पडले.

अक्षर पटेल – मेहा पटेल

भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलबरोबर २७ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले. गुजरातमधील वडोदरामध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

शार्दुल ठाकूर – मिताली पारुलकर

पुढील लग्न या वर्षी भारतीय अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचे होते; ज्याने त्याची मैत्रीण मिताली पारुलकर हिच्याबरोबर शाही विवाह केला. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत मराठमोळ्या रीतीरिवाजानुसार दोघांनी लग्नगाठ बांधली.

ऋतुराज गायकवाड – उत्कर्षा पवार

क्रिकेट जगतातील पुढचे लग्न भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचे होते. ऋतुराज गायकवाडने ३ जून २०२३ रोजी उत्कर्षा पवार हिच्याबरोबर लग्न केले. उत्कर्षा ही महाराष्ट्र क्रिकेट संघातील खेळाडू आहे.

प्रसिद्ध कृष्णा – रचना

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ८ जून २०२३ रोजी पारंपरिक दक्षिण भारतीय रीतीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाला. रचना असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवदीप सैनी – स्वाती अस्थाना

अनेक महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने २३ नोव्हेंबरला प्रेयसी स्वाती अस्थानाबरोबर लग्न केले. उदयपूरच्या देबारी येथील आनंदम रिसॉर्टमध्ये दोघांनी सात फेरे घेतले.