Dangerous Stunts Video Viral: आजच्या काळात तरुणांमध्ये रील बनवण्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. ऊठसूठ रील बनवण्यात सर्वच मग्न असलेले दिसतात. विषय, वेळ आणि जागेचंही काही बंधन नसतं. हातात मोबाईल घेतला की, लागले रील बनवायला. सोशल मीडियावर रोज अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात. रील हा असा आजार लोकांना लागला आहे की, अनेक जण प्रसिद्ध होण्यासाठी जीव धोक्यात येईल अशा गोष्टी करतात. अशा व्हिडीओंमधून चुकीचा संदेश जाण्याची भीती असते. पण तरीही लोक असे व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुण अतिशय धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.
आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि तुम्हाला जवळजवळ प्रत्येक जण सोशल मीडियाच्या कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर आढळेल. काही लोक सोशल मीडियावर रील बनवतात आणि पोस्ट करतात, तर काही लोक त्या रील पाहण्यासाठी जातात. जर तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि रील पाहत असाल, तर तुम्ही पाहिले असेल की, काही लोक फक्त रीलसाठी आपला जीव धोक्यात घालतात. असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दाखवले होते?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका उंच टेकडीचा दिसतो. तिथे दोन मुले झाडाच्या फांदीला लटकण्याचा खेळ खेळत आहेत आणि मजा करीत आहेत. आता जर एखाद्याचा हात फांदीवरून सुटला किंवा फांदी तुटली तर काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही. रील व्हायरल करण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी लोक ज्या प्रकारची मूर्खता करत आहेत, ती खरोखरच चिंताजनक आहे.
व्हायरल व्हिडीओ येथे पहा
तुम्ही नुकताच पाहिलेला व्हिडीओ @rajkumarsa67213 नावाच्या अकाउंटवरून X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘२० सेकंदांच्या रीलसाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले.’ बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, व्हिडीओ १ लाख ६६ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट करीत लिहिले, “कदाचित त्यांना त्यांच्या पालकांची पर्वा नसेल.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “त्यांच्याबद्दल काय बोलावे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “आपल्या देशाला अशा धाडसी लोकांची गरज आहे, ज्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही.”