स्वप्न साकारण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर ध्येयाला गवसनी घालने फार अवघड नाही. हे संगळ सातत्याने केलं तर यश हमखास पदरात पडत, हे सिद्ध केलं आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं. या महिलेच्या कौतुकास्पद कामगिरीने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५७ वर्षीय आशा वर्कर ‘स्वर्णलता पती’ यांची कामगिरीने पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

खरं तर, बर्‍याच वेळा असे घडते की, काही लोक जीवनात अपयशी ठरल्यानंतर हार मानतात, परंतु सतत अपयशी ठरल्यानंतरही स्वर्णलता यांनी आपल्या परिश्रमांनी ध्येयाला गवसनी घातली. ज्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत. स्वर्णलता यांनी अनेकवेळा दहावीची परीक्षा दिली. त्या नापास होत होत्या. मात्र त्यांनी जीद्द सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा परीक्षा दिली. अखेल त्यांना यात यश मिळाले. भद्रकच्या भंडारीपोखरी ब्लॉकमधील कांती खेड्यातील रहिवासी असलेल्या स्वर्णलता यांचे हे यश गावातील इतर महिलांसाठी एक उदाहरण बनले आहे. घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे स्वर्णलता यांची शिकण्याची इच्छा असतांना ती अर्धवट राहिली होती.

परिस्थितीमुळे केले होते फक्त सातवी पर्यंत शिक्षण पुर्ण

स्वर्णलता यांनी फक्त सातवी पर्यंत शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर लहान वयातच त्यांचे लग्न झाले. परंतु त्यांच्या जीवनातील अडचणी इथं संपल्या नाहीत. वयाच्या २७ व्या वर्षी स्वर्णलता यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्या विधवा झाल्या. त्यामुळे घरातील मुलांची जबाबदारी स्वर्णलताच्या खांद्यावर पडली. पतीच्या निधनानंतर स्वर्णलता घर चालविण्यासाठी काम शोधू लागल्या. परंतु कमी शिक्षणामुळे स्वर्णलता यांना नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर स्वर्णलता यांनी गावातील शाळेतच स्वयंपाक करण्यास सुरवात केली. तेथे त्यांना या कामासाठी दररोज १०० रुपये मिळत होते.

हेही वाचा- कर्तव्यनिष्ठा… खांद्यावर लसींचा बॉक्स, पाठीवर मुलीला घेऊन नदी ओलांडून ‘ती’ लसीकरणासाठी गावात पोहचली

दोन्ही मुलांना दिले पदव्युत्तर शिक्षण

२००५ मध्ये स्वर्णलता यांची गावात आशा वर्कर म्हणून नेमणूक झाली. आशा वर्कर म्हणून स्वर्णलता यांनी मेहनतीने काम कले. त्यामुळे त्यांना अनेक बक्षिसे सुद्धा मिळाली. तसेच स्वर्णलता यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना पदव्युत्तर शिक्षण दिले. २०१९ मध्ये सरकारने आशा वर्करसाठी मॅट्रिक उत्तीर्ण होणे आवश्यक असल्या फतवा काढला. अगदी सुरुवातीपासूनच कष्टाळू असलेल्या स्वर्णलता यांनी हार मानली नाही आणि मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याचे निश्चित केले. दिवसा काम केल्यानंतर रात्री शिक्षण घेतलेल्या स्वर्णलता यांनी डिसेंबर २०१९ मध्ये राज्य मुक्त विद्यालयातून मॅट्रिकचा फॉर्म भरला. मार्च २०२० मध्ये ही परीक्षा होणार होती पण करोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली.

हेही वाचा- वडाची ३८४ झाडे लावणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीबाई

अखेर दहावी उत्तीर्ण…

यानंतर सप्टेंबर महिन्यात स्वर्णलता यांनी ओडिशा राज्य मुक्त विद्यालयातून परीक्षा दिली पण त्या नापास झाल्या. परत त्यांनी बगुराई हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा दिली पण त्या इंग्रजी विषयात ४ गुणांनी नापास झाल्या. यावर्षी सरकारने करोनामुळे पुन्हा दहावीची परीक्षा रद्द केली. यावेळी माध्यमिक शिक्षण मंडळाने (बीएसई) विद्यार्थ्यांच्या मागील रेकॉर्डचा विचार करत निकाल जाहीर केला. यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वर्णलता पति यांना दहावी पास म्हणून घोषित करण्यात आले आहे.