२०१४ मध्ये राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा झाली, त्या परीक्षेत प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक भारताच्या इतिहासावर खालील प्रकारचे प्रश्न विचारले होते- 

प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर खालील पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत.
१) खालीलपकी कोणती नाटके हर्षवर्धनने लिहिली?
अ) प्रियदíशका ब) रत्नावली क) नागानंद
१) फक्त अ २) फक्त अ आणि ब
३) फक्त ब आणि क ४) वरील सर्व
२) अजातशत्रूबाबत पुढीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) त्याचे नाव कुणिकसुद्धा होते. इ) तो र्हयक घराण्याचा शेवटचा शासक होता. उ) त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली. ऊ) त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले.
१) अ, इ व ऊ २) अ, उ व ऊ
३) अ, इ व उ ४) इ, उ व ऊ
३) त्याला निझाम-उल-मुल्क हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते. त्याला ओळखा?
१) चीन किलीच खान २) सादत खान
३) मुíशद कुली खान ४) हुसेन अली खान
४) औरंगजेबनंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता. अंबरचा सवाई राजा जयसिंग! त्याने जयपुर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने पाच ठिकाणी जंतरमंतर बांधले. पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही?
अ) बनारस ब) उज्जन क) मथुरा
ड) उदयपूर इ) अलाहाबाद
१) एक २) दोन ३) तीन ४) चार
महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल
एमपीएससी पूर्वपरीक्षेत दोन-तीन वर्षांपूर्र्वी साधारणत: महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूगोलावर भर असायचा. नवीन अभ्यासक्रमात मात्र, जगाचा भूगोल नव्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आला आहे. नकाशा समोर ठेवून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना भूगोलाचा अभ्यास सोपा होईल.
गेल्या दोन वर्षांपासून जगाच्या भूगोलावर विशेष प्रश्न विचारले गेले नाहीत. मात्र, आगामी काळात या उपघटकावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
एमपीएससीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गेल्या वर्षभरातील विविध परीक्षांचा अभ्यास केला तर भूगोलासंदर्भात एक महत्त्वाचा बदल लक्षात येईल, तो म्हणजे भूगोलावर काही प्रश्न प्रामुख्याने नकाशासंबंधीचे विचारले जातात. म्हणून परीक्षार्थीनी महाराष्ट्राचा व भारत आणि जगाचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करणे श्रेयस्कर. जगाच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी. नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा, जेणेकरून अभ्यास सोपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका- कॅनडा- दक्षिण अमेरिका इत्यादी, युरोप खंड, आफ्रिका खंड .
संदर्भग्रंथ
१) सर्वप्रथम इ. पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. त्याचबरोबर खालील पुस्तके अवश्य अभ्यासावीत.
= भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी
= महाराष्ट्राचा समग्र भूगोल- प्रा. ए. बी. सवदी
= जिओग्राफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ.
२०१४ मध्ये जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली त्या परीक्षेत महाराष्ट्राच्या, भारताच्या तसेच जगाच्या भूगोलासंबंधी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या पुढीलप्रमाणे होती-