भाईंदर: महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदर मधील महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले. आम्हाला पैसे नको तर सुरक्षा हवी’ असे या महिलांनी शासनाला ठणकावले. या महिलांची कृती चर्चेचा विषय बनली आहे.

बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत झालेल्या लैगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप पसरला असून शासनाविरोधात रोष दिसून येतोय. ठिकठिकाणी सामाजिक संस्थासह राजकीय पक्षाकडून आंदोलन करून निषेध नोंदवला जात आहे. बुधवारी मीरा भाईंदर मध्ये शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध करण्यात आला.काही महिलांनी भाईंदर पश्चिम येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेतून मिळालेले पैसे परत केले.

हेही वाचा >>>नरेंद्र मेहता आगामी निवडणुकीचे उमेदवार, भाजप कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा; अंतर्गत वाद पेटून उठण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबतची चित्रफित तयार करून त्यांनी ही माहिती दिली. आम्हाला अशा पैशांची  गरज नाही. शासनाने आम्हाला केवळ शासनाने सुरक्षा द्यावी असे त्यांनी सांगितले. एकीकडे सरकार मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही आणि दुसरीकडे लाडकी बहिण योजना देऊन भुलवले जात असल्याचा आरोप च्या महिलांनी केला. या महिलांच्या कृतीचे समाज माध्यमावर कौतुक होत आहे. दुपारी महिला कार्यलयात आल्या तेव्हा तहसीलदार उपस्थित नव्हते. आपल्या कार्यालयात कोणीही आले नसल्याचा दावा अप्पर तहसीलदार दिनेश गौडं यांनी केला आहे.