साध्या वेशातील पोलिसांकडून शहरावर नजर

वसई : संभाव्य दहशतवाद रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर वसई-विरार शहरातही प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी कक्षाची (एटीसी) स्थापना करण्यात आली आहे. हे पथक गुप्त पोलिसांप्रमाणे शहरातील प्रत्येक संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवणार असून दहशतवाद्यांना मदत पुरविणाऱ्या घटकांची माहिती गोळा करणार आहे.

Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार

देशाला सध्या दहशतवादांचा सर्वात मोठा धोका निर्माण झालेला आहे. अशा दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) च्या धर्तीवर स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत दहशतवादविरोधी कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचे काम म्हणजे गुप्त पोलीस असणार आहे.

 दहशतवादी कृत्यांमध्ये समाजमाध्यमांवर चालणारा कल कोणता, कुणी द्वेष किंवा धार्मिक भावना भडकावणारे लिखाण करत असेल तर त्यावर नजर ठेवणे, परदेशातून विशेषत: आखाती देशातून आलेल्यांवर नजर ठेवणे, कुणी अचानक नाहीसे झाले आहे का ते तपासणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. शहरातील रिक्षाचालक, सर्व संघटना, हॉटेल, रिसॉर्ट, इस्टेट एजंट यांची यादी तयार करणे, शहरात दाखल झालेल्या अनोळखी लोकांवर नजर ठेवणे, शहरात किती गॅरेज आहेत, वाहनांच्या नंबरप्लेट बनवणारे किती आहेत आणि सिम कार्ड देणारी दुकाने किती आहेत या सगळ्या गोष्टींची नोंदही या पथकामार्फत केली जाणार आहे. समाजमाध्यमांवर या सर्वाचे वेगवेगळे समूह तयार केले आहेत आणि दररोज त्यावर पोलिसांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जात आहे.

याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालण्याला प्रतिबंध करणे हे या पथकाचे प्रमुख काम आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामांपासून वगळण्यात आले आहे. दहशतवाद्यांना घर, वाहने, सिम कार्ड स्थानिक पातळीवरून पुरवले जातात. अशा घटकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. विषारी आणि प्रक्षोभक विचार धार्मिक स्थळांतून होतोय का त्यावर नजर ठेवली जाणार आहे. या माहितीच्या आधारे संभाव्य दहशतवादी घटनांना प्रतिबंध घातला जाणार आहे.

मुंबईच्या धर्तीवर संकल्पना

मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतर दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावर उपाययोजना करण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी ही संकल्पना प्रथम मांडली होती. आता दाते मीरा-भाईदर-वसई-विरारचे पोलीस आयुक्त असल्याने त्यांनी वसई-विरार शहरातही या कक्षाची स्थापना केली आहे. दहशतवादविरोधी कक्ष म्हणजे एक प्रकारे गुप्त पोलीस आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कक्ष

प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक दहशतवादविरोधी कक्ष कार्यरत राहणार आहे. त्यात एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये या कक्षाचा मोठा फायदा झाला होता. याशिवाय इतर गुन्हेगारी प्रवृती, समाजकंटक, समाजविघातक कृत्यांनादेखील आळा घातला गेला होता. या कक्षामुळे स्थानिक पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाया करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत एक स्वतंत्र दहशतवादविरोधी कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे समाजकंटक, दहशतवादीकृत्ये, धार्मिक विद्वेष आदींना प्राथमिक स्तरावर आळा घातला जाईल.

-विजयकांत सागर, उपायुक्त, (मुख्यालय) मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय