वसई: वसई पाठोपाठ नालासोपारा मतदारसंघात ही शनिवारी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची गृह मतदान प्रक्रिया पार पडली. १३० अर्जदारापैकी १२१ नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ८५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या १२ डी नमुन्याचे वाटप केले होते. त्यापैकी १३० मतदारांनी १३२ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केले होते.

हेही वाचा :वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी या मतदारसंघात या मतदानांची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी १३ पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्याद्वारे मतदारांच्या घरी मतपेटी घेऊन जाऊन मतदान घेण्यात आले. गृह मतदानासाठी नोंदणी झालेल्या १३० मतदारांपैकी १२१ नागरिकांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र. यावेळी गृह मतदान पद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मतदान करणं सोप्प झालं आहे. त्यामुळे मत टक्का वाढण्यास ही मोठी मदत होणार आहे. तर आदल्या दिवशी १३३ वसई मतदारसंघात ही गृहमतदान घेण्यात आले होते. तेव्हा ३७४ नागरिकांपैकी ३६० नागरिकांनी गृहमतदानाचा हक्क बजावला होता.