वसई विरार महापालिकेने जून महिन्याच्या अखेपर्यंत तब्बल ८२ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत जून महिन्यात ४० कोटी रुपयांनी मालमत्ता कराचे उत्पन्न वाढले आहे. पालिकेच्या इतिहासामध्ये जून महिन्यात प्रथमच एवढी विक्रमी उत्पन्न जमा झाले आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रात ९ लाख ७ हजार १७७ एवढय़ा मालमत्ता आहेत. पालिकेची मागील आर्थिक वर्षांत ३१२ कोटींची वसुली झाली होती. या वर्षी पालिकेने ५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अधिकाधिक मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने पहिल्या दिवसापासूनच उपाययोजना सुरू केल्या होत्या. ३० जूनपर्यंत पालिकेने ८२ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ४० कोटी ९२ लाख एवढे होते. म्हणजेच पालिकेने मागील वर्षांच्या तुलनेत ४० कोटी रुपयांची जास्त वसुली केली आहे. १५ जूनपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता. गुरुवार, ३० जून रोजी महिन्याच्या शेवटच्या दिवशी एका दिवसात साडेतीन कोटी रुपये जमा झाले होते.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

नियोजनाचा सकारात्मक परिणाम
मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी पालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यानुसार ९५ टक्के मालमत्ता कराचे वाटप करण्यात आले होते.

मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच जनजागृती करण्यात आली होती. त्यासाठी जाहिराती, भित्तिपत्रके लावणे, शहरात प्रचार करणे यांचा समावेश होता. नागरिकांना मालमत्ता कर अधिक सुलभरीत्या भरता यावा. ऑनलाइन तसेच विविध अॅपच्या माध्यमातून सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. ३० जूनपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास पाच टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती. त्याचादेखील फायदा झाला.
अधिकाधिक मालमत्ता कराचा भरणा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सातत्याने करत असलेली जनजागृती, वेळेवर देण्यात आलेली बिले यांचा मोठा फायदा झाला. – समीर भूमकर, उपायुक्त (कर) वसई-विरार महापालिका