वसई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली असून, गुरुवारी वसई तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) तपासणी व पडताळणी करण्यात आली.
वसईत आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीची तयारी म्हणून या मशीन पडताळणी करण्यात आल्या. यावेळी ईव्हीएममध्ये दोन युनिट कार्यान्वित असल्याची खात्री करण्यात आली. यापैकी कंट्रोल युनिट आणि बॅलेटिंग युनिट हे युनिट केबलने जोडलेले असतात. ईव्हीएमचे कंट्रोल युनिट पीठासीन अधिकारी किंवा मतदान अधिकाऱ्याकडे ठेवले जाते. मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान युनिट मतदान कक्षात जेव्हा ठेवले जाते तेव्हा मतदान अधिकारी मतदाराची ओळख पडताळतात.
ईव्हीएममध्ये, मतपत्रिका देण्याऐवजी, मतदान अधिकारी बटण दाबतात ज्यामुळे मतदाराचे मतदान होते. याबाबतचे यंत्र तपासणी करण्यात आली. उमेदवारांच्या नावांची किंवा चिन्हांची यादी मशीनवर उपलब्ध असते. ज्याच्या शेजारी निळे बटण असते. मतदार ज्या उमेदवाराला मतदान करू इच्छितात त्याच्या नावाशेजारी असलेले बटण दाबून केलेले मतदान होते क़ा याची खातरजमा करण्यात आली असल्याची माहिती तहसीलविभागाने दिली आहे. या तपासणी प्रक्रियेत तलाठी व प्रशासनातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.