News Flash

फर्निचर : सेंटर टेबल

आपण फर्निचर शोरूममध्ये गेलात की आपणास सेंटर टेबलची प्रचंड विविधिता पाहावयास मिळते.

लिव्हिंग रूमच्या इंटिरियरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सिटिंग. पण सीटिंग म्हणजे केवळ सोफा नव्हे. तर सोफा, सेंटर टेबल व कॉर्नर टेबल यांचा परिपूर्ण संच. त्यामुळे निवड करताना केवळ सोफ्यावर लक्ष केंद्रित न करता सेंटर टेबलही काळजीपूर्वक निवडायला हवे.

आपण फर्निचर शोरूममध्ये गेलात की आपणास सेंटर टेबलची प्रचंड विविधिता पाहावयास मिळते. ऑनलाइन फर्निचर पोर्टल्सवरही खूप प्रकार उपलब्ध आहेत. सेंटर टेबल बनवून घेण्यापेक्षा रेडीमेड घ्यावे. कारण रेडीमेड सेंटर टेबलचे फिनिश चांगले असते. पण मटेरियलची गुणवत्ता मात्र आपण ज्या शोरूममधून घेताय त्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. सेंटर टेबल हे लाकूड, फ्लायवूड, काच, फायबर, दगड, मेटल, बांबू अशा अनेक प्रकारच्या मटेरियल्सपासून बनवले जाऊ शकते. बहुतेक डिझाइन्समध्ये सेंटर टेबलचा टॉप हा काचेचा बनलेला असतो. घरी लहान मुले असल्यास काचेचा टॉप टाळावा व घ्यायचाच असेल तर वापरलेली काच टफन्ड या प्रकारातली असेल याची खात्री करून घ्यावी. टफन्ड ग्लास जरी तुटली तरी तिचे नेहमीच्या काचेप्रमाणे अणकुचीदार तुकडे होत नाहीत व इजा टळते व खरं तर टफन्ड ग्लास सहसा तुटत नाही.

सेंटर टेबलची साइजदेखील खूप महत्त्वाचीआहे. साधारणपणे ही साइज तीन फूट x दीड फूट इतकी असते. पण ही साइज आपल्या सीटिंग एरियाच्या साइजप्रमाणे कमी-जास्त होऊ शकते. फोल्डेबल सेंटर टेबल्सही उपलब्ध आहेत. या सेंटर टेबल्सचा टॉप फोल्ड केल्यावर लहान व अनफोल्ड केल्यावर मोठा होतो. जेणेकरून आपल्या गरजेनुसार आपण वापरू शकता. काही इंपोर्टेड फर्निचर शोरूममध्ये आपणास अशीही काही डिझाइन्स पाहावयास मिळू शकतील, ज्यात सेंटर टेबलचं डायनिंग टेबल होऊ शकतं. हल्ली आणखी एक डिझाइन लोकप्रिय आहे. ते म्हणजे सेंटर टेबलच्या टॉपखाली पूफीज असणे. पूफी म्हणजे छोटंसं सीटिंग दोन किंवा चार पूफीज सेंटर टेबलखाली स्टोर करता येतात. जास्त पाहुणे आल्यास या पुफीज बाहेर काढून वापरता येतात. हे डिझाइन खूपच उपयुक्त आहे. काही डिझाइन्समध्ये टॉपखाली एक शेल्स असते ज्यावर आपण वर्तमानपत्र, मासिक ठेवू शकता. काही डिझाइन्समध्ये एखादा छोटासा ड्रॉवर असतो ज्यात आपण टी.व्ही. रिमोट वा तत्सम छोटय़ा गोष्टी ठेवू असतो. आपण आपल्याला हवे तसे डिझाइन निवडू शकता. केवळ एवढे लक्षात असावे की टेबल बोजड होता कामा नये. सेंटर टेबलच्या खाली एखादा छोटा गालीचा किंवा रग ठेवण्याचा ट्रेंड आहे त्यामुळे सेंटर टेबल खुलून दिसते. या रग्जची किंमत रु. ५,०००/- ते ५०,०००/- इतकी आहे तर सेंटर टेबल्स आपल्याला अगदी हजार-पंधराशेपासून लाखाच्या किमतीपर्यंत मिळू शकतात. सेंटर टेबल हा छोटा घटक असला तरी महत्त्वाचा आहे. कारण सेंटर टेबलची जर निवड चुकली तर सोफा कितीही चांगला असेल तरीही तो परिपूर्ण दिसणार नाही. म्हणूनच सेंटर टेबल हे काळजीपूर्वक निवडावे.

(इंटिरियर डिझायनर)

ajitsawantdesigns@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:07 am

Web Title: article on center table center table furniture
Next Stories
1 रेरा विश्लेषण : रेरा आणि प्राधिकरणाची स्पष्टीकरणे
2 निसर्गरम्य आणि सोयीसुविधांनी युक्त नेरळ-कर्जत
3 उद्यानवाट : फुलझाडे
Just Now!
X