शब्दांकन: श्रुती कदम

इतिहास के पन्ने फिरसे ना दोहराएंगे

सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद न आएंगे

‘एच. टी. स्मार्ट कास्ट’ प्रस्तुत फीव्हर एफ एमवर प्रसारित होणाऱ्या ‘महाभारत’ या पॉडकास्टमधील प्रत्येक भागात एक स्वतंत्र कथा सांगितली जाते. कोणी एक आर. जे, हा पॉडकास्ट सादर न करता अनेक कलाकार मंडळी मिळून या पॉडकास्टमधील विविध पात्रं सादर करतात. ‘महाभारत’ या पॉडकास्टमधील ‘द्रौपदी इन ऑल ऑफ अस’ या भागात वस्त्रहरणाची कथा आणि त्यावेळी द्रौपदीच्या मनाची जी अवस्था होती त्याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. देव असो किंवा मनुष्य स्त्रियांवर होणारा जाच हा तेव्हाही सुरू होता आणि आजदेखील सुरूच आहे. त्याकाळात द्रौपदीच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण होते, परंतु आज समाजात ज्याप्रकारे स्त्रीवर अत्याचार होतो त्यावर तिनेच खंबीरपणे स्वत:चे रक्षण केले पाहिजे असा संदेश हा भाग संपताना सादरकर्ता देतो आणि ‘इतिहास के पन्ने फिरसे ना दोहराएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद न आएंगे’ ही शायरी आपल्या श्रोत्यांना ऐकवतो.

हेही वाचा >>> ऐकू आनंदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाकाळात रामायण आणि महाभारत टीव्हीवर लगायचे तेव्हा मला महाभारत नक्की का घडले? आणि नक्की आपला इतिहास काय आहे? याविषयी एवढी माहिती नव्हती. महाभारतातील कथा वाचण्याची आणि त्याविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा महाभारत बघताना निर्माण झाली. तेव्हापासून हा पॉडकास्ट ऐकायची सवय झाली. अनेक नवीन गोष्टी समजत गेल्या तेव्हा पासून मी रोज एक भाग ऐकल्यावर माझ्या बाबांसमोर बसून महाभारताबद्दल अजून जाणून घेऊ लागले. याची सवय एवढी वाढली की त्यानंतर मी इतिहास या विषयात एम.ए. करायचे ठरवले. काही कथांचा आपल्या आयुष्यावर फार परिणाम होतो. मला ‘द्रौपदी इन ऑल ऑफ अस’ ही कथा तशी वाटली. आपण प्रगत तर झालो, पण स्त्रियांना दुय्यम तेव्हाही समजले जायचे आणि आजही त्यांना दुय्यमच वागणूक दिली जाते याची खंत वाटते.  – मृणाली ठाकूर (विद्यार्थिनी )