ऐरोली सेक्टर ८ येथील फ्रॉन्शिला फ्रॉन्सिको वाझ या आठवर्षीय शालेय विद्याíथनीची अपहरण करून हत्या केल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रष्टद्धr(२२४)्ना ऐरणीवर आला आहे.  या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेच्या नवी मुंबई विभागाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे व शिक्षणाधिकारी दत्तात्रय नागरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व शालेय बसचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी मनसेतर्फे भरारी पथक स्थापन करण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबधी शालेय बस धोरणानुसार १५ वर्षांपूर्वीच्या बसेसमधून विद्यार्थ्यांची ने-आण करू देऊ नये. बसमध्ये प्रथमोपचार पेटी आणि आय.एस.आय.मार्क असलेली दोन अग्निशामके ठेवण्यास सांगणे, तसेच प्रत्येक बसमध्ये चालकाशिवाय एक मदतनीस ठेवण्यात येण्याची सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मनसेचे भरारी पथक स्थापन करून ते नियमाविरुद्ध बस चालविणाऱ्या चालकांवर लक्ष ठेऊन त्याबातची माहिती देण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला योग्य ते सहकार्य करेल असे मनसेचे महाराष्ट्र महिला सेना उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी सांगितले. या मागण्यांचा विचार करून लवकरच सीसीटीव्ही व जीपीएस यंत्रणा स्कूलमध्ये लावण्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, पालक, शालेय बस मालकांची बैठक आयोजित करू तसेच येत्या १५ दिवसांत स्कूल बसेसची तपासणी मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  संजय धायगुडे यांनी यावेळी दिले.