News Flash

सागर जोंधळेंवर गुन्हा दाखल

जोंधळे विद्यासमूहाचे संचालक सागर जोंधळे यांच्यासह सहा जणांवर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशावरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी

| December 21, 2013 01:06 am

जोंधळे विद्यासमूहाचे संचालक सागर जोंधळे यांच्यासह सहा जणांवर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशावरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये सुमन सातपुते, सागर जोंधळे, देवेंद्र जोंधळे, वैशाली जोंधळे, नरेंद्र चौधरी, लक्ष्मण पठारे यांना आरोपी करण्यात आले आहे. समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. समर्थ समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी, महाविद्यालयाचा कारभार ताब्यात देण्यासाठी कट कारस्थान रचणे, आर्थिक मोबदल्याची मागणी करणे, दुष्ट हेतूने खोटय़ा तक्रारी करणे असे प्रकार आरोपींकडून करण्यात येत असल्याचे शिवाजीराव यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:06 am

Web Title: case filed against sagar jondhale
Next Stories
1 टपोरींचे माहेरघर!
2 मालमत्ता प्रदर्शनात केवळ मंदीचेच दर्शन..
3 चोर सोडून संन्याशाला..
Just Now!
X